Friday, April 26, 2024
Homeधुळेलहानांचे भांडण; मोठ्यांमध्ये हाणामारी

लहानांचे भांडण; मोठ्यांमध्ये हाणामारी

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शिंदखेडा तालुक्यातील दलवाडे येथे लहान मुलांच्या भांडणातून मोठ्यामध्ये हाणामारी झाल्यांची घटना घडली.

- Advertisement -

याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून सहा जणांविरूध्द शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाना बन्सी कोळी (वय 35 रा. दलवाडे) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार दि.3 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पुतण्या मनिष व जितेंद्र रूपलाल यांचा लहान मुलगा देवेश या लहान मुलांचे भांडले झाले.

तेव्हा भाऊ योगेश याने त्यांचे भांडण सोडविले. त्यादरम्यान जितेंद्र रूपलाल कोळी, गणेश रूपलाल कोळी व रूपलाल रघा कोळी (रा. दलवाडे) यांनी यास हाताबुक्यांनी मारहाण केली.

तेव्हा भांडण सोडविण्यासाठी आलेले नाना कोळी व वडील बन्सी कोळी यांना जितेंद्र याने लाकडी दांडक्याने दोघांच्या डोक्यावर मारले.

त्यात दोघे जखमी झाले. तर रूपलाल याने बन्सी कोळी यांना शिविगाळ करत हाताबुक्यांनी मारहाण केली.

त्यानुसार वरील तिघांवर शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकाँ सोनवणे करीत आहेत.

तर परस्परविरोधात जितेंद्र रूपला कोळी (वय 30 रा. दलवाडे) यांनी शिंदखेडा पोलिसात तक्रार दिली आहे. लहान मुले योगेश कोळी यांच्या घराच्या अंगणात खळेत होते.

तेव्हा योगेश कोळी याने दारूच्या नशेत शिवीगाळ केली. त्याबाबत लहान मुलांना अंगणात खेळू देण्याचा जाब विचारल्याच्या राग येवून योगेश याने भावना जितेंद्र कोळी यांना लाकडी दांडक्याने डाव्या हाताच्या मनगटावर मारले.

तर जितेंद्र याच्या डोक्यावर मारून जखमी केले. तेव्हा मोठी वहिनी सोडविण्यासाठी आली असता तिलाही बन्सी राघा कोळी याने काठीने मारहाण केली.

तसेच ज्ञानेश्वर बन्सी कोळी याने देखील शिविगाळ केली. दरम्यान हा वाद पोलिस पाटीलव ग्रामस्थांनी सोडविले. त्यानुसार वरील तिघांवर शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या