Type to search

maharashtra धुळे

लौकी शिवारात 200 लिटर स्पिरीट जप्त

Share
धुळे । राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शिरपूर तालुक्यातील लौकी शिवारातून दोन स्पिरीटने भरलेले 200 लिटर क्षमतेचे प्लॅस्टिकचे ड्रम हस्तगत केले़ त्याची किंमत 21 हजार 200 रुपये इतकी आहे़ दरम्यान, जप्त करण्यात आलेले स्पिरीट बेवारस आढळून आले आहे़

शिरपूर तालुक्यातील लौकी शिवारातील दगडी खदानीजवळ लौकी-हाडाखेड रस्त्याशेजारी बेकायदेशीर आणि अवैधरित्या स्पिरीट लपवून ठेवले असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली़ या माहितीच्या आधारे पथकाने अचानक छापा टाकला असता तेथे दोन स्पिरीटने भरलेले 200 लिटर क्षमतेचे प्लॅस्टिकचे ड्रम आढळून आले़ त्याची किंमत 21 हजार 200 इतकी आहे़ सदर साठा बेकायदेशीर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संचालक सुनील चव्हाण, विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ़ मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक शिरपूर विभागाने ही कारवाई केली़ शिरपूर विभागाचे निरीक्षक ए़ यू़ सूर्यवंशी, हाडाखेडचे निरीक्षक व्ही़ बी़ पवार, दुय्यम निरीक्षक एम़ पी़ पवार, एऩ एस़ गायकवाड, हाडाखेड नाकाचे आऱ जे़ जाधव, सहायक दुय्यम निरीक्षक एस़ एस़ गोवेकर, जवान शांतीलाल देवरे, प्रशांत बोरसे, कपिल ठाकूर, केतन जाधव, आऱ बी़ चौरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!