गस्ती पथकाने आंबा शिवारात एक लाखाची दारू पकडली

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

0
धुळे । राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गस्तीवर असतांना वाहनाची तपासणी करून दारु पकडली आहे़ वाहनासह पाच लाख 80 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे़

याबाबत माहिती अशी की, शिरपूर तालुक्यातील आंबा ते वरला रस्ता दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक गस्त घालत असतांना पथकाने वाहनांची तपासणी केली़ परंतु शनिवारी दि. 20 एप्रिल रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या पथकाला एमपी 04 जीए 2836 क्रमांकाची बोलेरो वाहन संशयास्पद रित्या येत असल्याचे निदर्शनास आले व सदर वाहन थांबविण्यात आले़ चालकाची चौकशी केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली़.

त्यामुळे संशय अधिकच बळावला़ व पथकाने वाहनाची तपासणी केली असता त्यात मध्यप्रदेश निर्मित व विक्री करता असलेले एकूण बिअर दारुचे 88 बॉक्स आढळून आले़ या बॉक्समध्ये एक हजार 56 बाटल्या होत्या़ त्याची एक लाख 5 हजार 600 रुपये इतकी किंमत आहे़ ताब्यात घेण्यात आलेल्या वाहनाची चार लाख 75 हजार इतकी किंमत आहे़ असा एकूण पाच लाख 80 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ याप्रकरणी संतोष सायदास राठोड (28, रा़ दुगाणी ता़ वरला, मध्यप्रदेश) आणि संजय शांतीलाल जमरे (25, अस्फताल फलीया, ग्राम सावरीया, ता़ पाटी, ज़ि बडवानी, मध्यप्रदेश) या दोघा संशयितांची प्राथमिक चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे़

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ़ मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली आहे़ दोघांना अटक करण्यात आली आहे़

LEAVE A REPLY

*