विनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे । दि.19 । प्रतिनिधी

0
शहरातील गणपती मंदिराजवळील पांझरा नदी पात्रात प्लॅटफॉर्मवर विनापरवानगी महादेवाची मुर्ती ठेवून आदेशाचा भंग म्हणून दिलीप साळुंखेंसह त्यांच्या सहकार्‍यांविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पांझरा नदी पात्रात बुधवारी महादेवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे धर्मेद्र झाल्टे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणपती मंदिराजवळील पांझरा नदीच्या पात्रात झुलत्या पुलाचे बांधकाम सुरू करणे इतकेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयाचे कार्यक्षेत्राचे मर्यादीत असतांना बांधकाम करण्यात आलेल्या प्लॅट फॉर्मवर श्री शकंराची मुर्ती ठेवतांना जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती यांची पुर्व परवानगी घेणे आवश्यक असतांना देखील पुर्व परवानगी न घेता तसेच राष्ट्रपुरूष/थोर व्यक्ती यांचा पुतळा उभारण्यास परवानगी देण्यासाठी मार्गदर्शन तत्वे विहीत केलेल्या आदेशांकडे व जमावबंदी आदेशांकडे दुर्लक्ष करून उभारण्यात आलेल्या प्लॅटफॉर्मवर विना परवानगी श्री शंकराची मुर्ती के्रनच्या सहाय्याने ठेवून आदेशाचा भंग केला.

त्यानुसार सामाजिक कार्यकर्ता दिलीप साळुंखे (रा. नवनाथ महाराज मंदिराजवळ, राजीव गांधी शाळेजवळ, देवपूर) व त्यांना मदत करणारे इतर सहकरी यांच्याविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक गणेश चौधरी करीत आहेत.

LEAVE A REPLY

*