Type to search

बसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त

maharashtra धुळे

बसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त

Share
धुळे । इंदूरकडून शहरात येणार्‍या मध्यप्रदेश परिवहन विभागाच्या बसमधून तब्बल 1 लाख 29 हजार रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून पुणे येथील एका प्रवाशालाही ताब्यात घेण्यात आले आहे. शहरातील नरडाणा चौफुलीवर काल दि. 18 रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर नियुक्त करण्यात आलेल्या पथकासह देवपूर पोलिसांनी काल रात्री नरडाणा चौफुलीवर वाहनांची तपासणी केल. त्यात साडेअकरा वाजेच्या सुमारास मध्यप्रदेश परिवहन विभागाच्या बसची (क्र. एमपी 11 पी 8055) तपासणी केली. तेव्हा गाडीच्या डिक्कीत व टपावर 7 प्लॅस्टिकच्या गोण्या मिळून आल्या. बस वाहक व चालकाने विचारपुस केली असाता त्यांनी त्या गोण्या इंदूर येथील बसलेल्या राजेश भगवान उपाध्याय (रा. शिक्रारपु, तळेगावरोड, पुणे) याच्या असल्याचे सांगितले. पथकाने त्याला याबाबत विचारले असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. गोण्या उघडल्या असता त्यात विमल गुटखा, राजश्री गुटाखा, आरएमडी व तंबाखु जन्य पदार्थ असा एकुण 1 लाख 29 हजार 245 रूपये किंमीचा गुटाखा मिळून आला. पोलिसांनी गुटखा जप्त केला असून त्या प्रवाशालाही ताब्यात घेतले. याप्रकरणी देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पथक प्रमुख पांडुरंग ठाकरे, शेख गुलाम दस्तगीर मोहीद्दीन यांच्यासह पोलिस निरीक्षक संजय सानप,सपोनि पटेल, पोकाँ आबासाहेब राठोड, पोहेकाँ किरण सोनवणे, पी.एन. चव्हाण, एस. बी. चिंचोलीकर, किरण साळवे आदींनी केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!