राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण

0
धुळे – माहिती अधिकाराचे उत्तर दिले नाही याचा राग येवून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांच्या कॅबीनमध्ये येवून लिपीकाची कॉलर पकडून मारहाण करून डोक्यास जखम करून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे राज्य उत्पादन शुल्क विभागात संजय पुरूषोत्तम जयस्वाल (रा. शिरपूर) याने माहिती अधिकारातून माहिती मागविली होती. परंतू त्याबाबत संबंधिताने उत्तर दिले नाही. याचा राग येवून दि. 16 एप्रिल रोजी दुपारी 4.30 वाजता संजय जयस्वाल हा जोरजोरात आरडाओरड करीत अधीक्षक अंचुळे यांच्या कॅबीनमध्ये आला व तेथे शासकीय कामात अडथळा निर्माण करून लिपीक नितीन विठ्ठल वाघ (वय 30) यांचे दोन्ही हात धरून शर्टची कॉलर पकडून बुक्क्यांनी मारहाण करून डोक्यास जखम केली. व तु मला ऑ फीसच्या बाहेर भेट, अशी धमकी देवून तुझ्यावर अ‍ॅण्टी करप्शन करेल व पैशांची मागणी केली असा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी जयस्वाल याने दिली.

याबाबत शहर पोलिस ठाण्यात नितीन वाघ यांनी फिर्यादी दिली. भांदवि 353, 332, 506 प्रमाणे संजय जयस्वाल विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा आढावा डीवायएसपी सचिन हिरे, पो.नि जी.एन. चौधरी यांनी घेतला.

LEAVE A REPLY

*