तरुणावर हल्ला; सात जणांविरुद्ध गुन्हा

0
धुळे । दि.24 । प्रतिनिधी-खट्याळ आंबा ता. साक्री येथे पत्नीची छेड काढल्याच्या कारणावरुन तरुणावर हल्ला करुन मारहाण केल्याप्रकरणी सात जणांविरुध्द पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, खट्याळ आंबा येथे राहणारा खंडू शांताराम भोये (वय28) याची पत्नी दळण घेण्यासाठी पिठाच्या गिरणीवर गेली असता तेथे छेड काढल्यावरुन दादल्या रुपचंद चौरेशी वाद झाला.
या वादातून दादल्यासह सात जणांनी खंडू भोयेवर हल्ला केला. त्याला मारहाण करुन जखमी केले. याबाबत खंडू शांताराम भोये यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

भादंवि 143, 147, 149, 325, 323, 504, 506 प्रमाणे दादल्या रुपचंद चौरे, दोधा शिवराम चौरे, पोपट बंडू भोये, आक्काबाई पोपट भोये, आशोक शिवराम चौरे, अशोक चौरेचा मुलगा, छोटू शिवराम चौरे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपास पोहेकॉ परदेशी हे करीत आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तरुणीचे अपहार- कुरकवाडे, ता. शिंदखेडा येथे राहणारे योगेश अर्जून अहिरे यांची मुलगी आमिशा (वय17) हिला अज्ञात व्यक्तीने काहीतरी फुसलावून पळवून नेले. याबाबत दोंडाईचा पोलिस ठाण्यात योगेश अर्जुन अहिरे यांनी फिर्याद दिली. भादंवि 363 प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोसई एन.आर.मोरे हे करीत आहेत.

 

 

LEAVE A REPLY

*