शिनकर बंधूंना सात दिवस पोलीस कोठडी

0
धुळे । दि.29 । प्रतिनिधी-संचालक पदाचा गैरवापर व बनावट कागदपत्रांच्या आधारे दादासाहेब वामन विष्णू शिनकर पतसंस्थेत सात कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी देवपूर पोलिसांनी अभय देवीदास शिनकर आणि उदय देवीदास शिनकर या दोघा बंधूंना अटक केली.
त्यांना काल न्यायालयात हजर केले असतांना दोघांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. याबाबत फेब्रुवारी महिन्यात देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

दोघा बंधुंचा पोलिस शोध घेत होते. परंतू दोघे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. अभय व उदय हे मंगळवारी जिल्हा न्यायालयात जामिनासाठी आले तेव्हा सरकारी वकील व तपास अधिकार्‍यांनी न्यायालयाला विनंती केली त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघांना 6 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

विवाहितेचा छळ- वडिलांचे घर पतीच्या नावाने करुन द्यावे यासाठी सौ. सीमाबाई देवमन भिल रा. न्याहळोद या विवाहितेला हाताबुक्क्यांनी मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली तसेच छळ केला अशी फिर्याद सौ. सीमाबाई देवमन भिल यांनी दिली. भादंवि 498 (अ), 323, 504, 506 प्रमाणे देवमन हिरामण सोनवणे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

मोटार सायकल घेण्यासाठी माहेरुन 60 हजार रुपये आणले नाहीत व मुलगा होत नाही म्हणून सौ. मेघा योगेश अहिरे रा. पिंपळनेर या विवाहितेचा छळ करुन हाताबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच ठार मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद सौ. मेघा अहिरे यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात दिली. भादंवि 498 (अ), 323, 504, 506 प्रमाणे योगेश गोरख अहिरे, गोरख जगन्नाथ अहिरे, सौ. मीना गोरख अहिरे, महेश गोरख अहिरे, माधुरी महेश अहिरे, पंकज दत्तात्रय अहिरे, कविता पंकज अहिरे, ताराचंद जगन्नाथ अहिरे, रेखा ताराचंद अहिरे, वैशाली दीपक खैरनार, दीपक भगवान खैरनार यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणाला मारहाण- सुराय, ता. शिंदखेडा येथे राहणारे ज्ञानेश्वर जगन्नाथ मिस्तरी (वय40) यांच्या घरातील चुलीचा धूर विष्णू वसंत मिस्तरी याच्या घरात गेल्याचा राग येवून विष्णूने ज्ञानेश्वर यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली.

तसेच घरात घुसून फळीचा तुकडा ज्ञानेश्वर मिस्तरी यांच्या डोक्यावर मारुन जखमी केले. अशी फिर्याद ज्ञानेश्वर जगन्नाथ मिस्तरी यांनी दोंडाईचा पोलिस ठाण्यात दिली. भादंवि 323, 504, 506 प्रमाणे विष्णू वसंत मिस्तरी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

 

 

LEAVE A REPLY

*