Type to search

धुळे

रागाच्या भरात युवतीची गळफासाने आत्महत्या

Share

धुळे | मजुरांसोबत डाळींबशेत पिकातील गवत काढुन घे, असे काम सांगितल्याचा रागातून युवतीने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंडाणे (ता. साक्री) येथे घडली. याबाबत पिंपळनेर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

रोशनी किसन पवार (वय १७ रा. मंडाणे ता. साक्री) असे युवतीचे नाव आहे. ती एकमुडी व तापट स्वभावाची होती. तिला घरातील कोणीही काही कामास विरोध अथवा प्रतिकार केल्यास ती मनात राग धरून बसायची. काल दि. २० रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तिला वडीलांनी मजुरांकडून डाळींबशेत पिकातील गवत काढुन घे, असे सांगितले होते. परंतू तिने त्यास नकार दिला. त्यानंतर तिला कामाबाबत समजावून सांगितले. त्याचा तिला  राग आला असावा. त्या रागाच्या भरात तिने शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत तिच्या वडीलांनी पिंपळनेर पोलिसात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!