Type to search

धुळे

हरियाणातून एकाला अटक, छत्तीसगडमधून ३६ लाखांचा मुद्येमाल हस्तगत

Share

धुळे | ट्रकमधील ३०० गोण्या सुपारीच्या मालाची परस्पर विक्री करून विल्हवाट लावल्या प्रकरणी शिरपूर तालुका पोलिसांनी हरियाणामधून एकाला अटक केली आहे. तसेच त्याच्या माहितीवरून बेमेतरा (छत्तीसगड) येथून ३८ लाख ६४ हजार रूपये किंमतीचा ३०० गोणी सुपारीचा माल हस्तगत करण्यास यश मिळविले आहे.

कर्नाटक राज्यातील सागर येथून ट्रकमधून (क्र. एच.आर ४६ सी ४४५३) सुपारीचा माल दि. ३ ते ११ जुलै दरम्यान दिल्ली येथे आणत असतांना चालक जोगेंदरसह रोशनसिंह (रा. कबुलपुर, आग्रा, उत्तरप्रदेश) व सतपाल बलवानसिंह (रा. टिटोली ता. रोहतक, हरियाणा)यांनी संगणमत करून ट्रकमधील ३८ लाख ६४ हजार रूपये किंमतीचा ३०० गोणी सुपारीच्या मालाची परस्पर विक्री करून विल्हवाट लावली. ट्रक हाडाखेड गावाजवळ उभा करू दोघे पसार झाले. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिसात संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे, अपर पोलिस अधीक्षक राजु भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी दीपक वारे यांनी उपनिरीक्षक योगेश ढिकले, सहा. उपनिरीक्षक दिलीप बाविस्कर, हवालदार संजय देवरे, पवन गवळी यांचे पथक आरोपींच्याा शोधासाठी हरियाणा राज्यात पाठविले. दोन दिवसात पथकाने सतपाल याला ताब्यात घेतले. त्याला शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात आणुन अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला सहा दिवस पोलिस कोठडी दिली. त्यात चौकशीत सतपाल याने गुन्हयाची कबुली दिली. माल बेमेतरा येथे ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने तेथून ३८ लाख ६४ हजार रूपये किंमतीचा ३०० गोणी सुपारीचा माल जप्त केला.पुढील तपास उपनिरीक्षक दिपक वारे करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!