पत्नीला जाळले; पतीला जन्मठेप धुळे जिल्हा न्यायालयाचा निकाल

0
धुळे । दि.24 । प्रतिनिधी-जेवणासाठी झोपेतून उठविल्याचा राग येवून पत्नीला रॉकेल टाकून पेटवून दिल्याप्रकरणी पती अभय नाना पाटील रा. वाघाडी, ता. शिंदखेडा याला जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश बावस्कर यांनी ठोठावली.
याबाबत माहिती अशी की, वाघाडी, ता. शिंदखेडा येथे राहणारा अभय नाना पाटील हा त्याच्या घरी दि. 14 ऑक्टोबर 2015 रोजी सायंकाळी 7 वाजता झोपलेला असतांना त्याची पत्नी शैलाबाई हिने नानाला जेवणासाठी झोपेतून उठविल्याचा राग येवून त्याने शैलाला शिवीगाळ करुन तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटता दिवा अंगावर फेकल्याने शैलाबाईच्या अंगावरील साडीने पेट घेतला.

यात ती गंभीररित्या जळाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार घेतांना शैलाबाईचा मृत्यू झाला. याबाबत नरडाणा पोलिस ठाण्यात भादंवि 302, 307, 504 प्रमाणे अभय नाना पाटील विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्हा न्यायालयात पोलिस उपनिरीक्षक काळे यांनी अभय पाटील विरुध्द दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. बावस्कर यांच्यासमोर सुरु झाला.

सरकारी अभियोक्ता पराग पाटील यांनी साक्षीदार तपासले. साक्षीपुरावा ग्राह्य धरुन अभय नाना पाटील याला दोषी ठरविण्यात आले.

भादंवि 302 अन्वेय जन्मठेप, एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश बावस्कर यांनी ठोठावली.

अखेर शैलाला न्याय मिळाला
झोपेतून जेवणासाठी उठविल्याचा राग येवून दि.14 ऑक्टोबर 2015 रोजी जिवंत शैलाला अभय नाना पाटील याने जाळले. न्यायालयात अभय पाटील विरुध्द दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयात खटला सुरु झाला तब्बल 20 महिन्यानंतर या खटल्याचा दि.22 जून 2017 रोजी निकाल लागला. शैलाला जाळणार्‍याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. यामुळे अखेर शैलाला न्याया मिळाला असे शैलाच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले.

 

 

LEAVE A REPLY

*