Type to search

धुळे

वीज गेल्याचा राग येवून वीज वितरण कंपनीच्या चक्करबर्डी कार्यालयात अधिकार्‍याला मारहाण

Share

धुळे । वीज पुरवठा खंडीत झाल्याचा राग येवून वीज वितरण कंपनीच्या शहरातील रामवाडी कक्षातील चक्करबर्डी कार्यालयात तिघांनी धुमाकुळ घालून वरिष्ठ तंत्रज्ञाला लोखंडी रॉडने व हाताबुक्यांनी मारहाण करून जखमी केले. तसेच कार्यालयाची तोडफोड करून नुकसान केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत वीज वितरण कंपनीचे रामवाडी कक्षातील चक्करबर्डी सबस्टेशनचे वरिष्ठ तंत्रज्ञ विनायक शंकर पाटोळे (वय 58) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, वीज पुरवठा खंडीत झाल्याचा राग येवून छोटु गवळी याने दि. 14 जुन रोजी दुपारी 4 वाजता दुरध्वनीवरून शिवीगाळ केली. त्यानंतर रामवाडी कक्षातील सबस्टेशन चक्करबर्डी येथील कार्यालयात छोटू गवळीसह तीन जण आले. त्यांनी लोखंडी रॉडने व हाताबुक्यांनी मारहाण केली. त्यात पाटोळे हे जखमी झाले. तसेच त्यांच्या जवळील थकीत विज बिलाचे 11 हजार 390 रूपये तिघांनी बळजबरीने हिसकावून नेले. तसेच शासकीय खुर्च्यांची तोडफोड करून नुकसान केले. त्यांच्या फिर्यादीवरून भादंवि 353, 394, 333, 294, 452, 427, 507, 34 प्रमाणे छोटु गवळीसह दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळाचा आढावा डीवायएसपी सचिन हिरे, पोनि गणेश चौधरी, पोसई बी.यु. मोरे यांनी घेतला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!