महिलेचा विनयभंग : एकावर गुन्हा

0
धुळे । दि.23 । प्रतिनिधी-अंगणात झोपलेल्या महिलेचा विनयभंग करुन अतिप्रसंग करण्याची धमकी दिल्याप्रकरणी साक्री तालुक्यातील इंधवे येथील योगेश देविदास वाघ याच्यावर निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अंगणात खाटेवर झोपलेली असताना योगेश देविदास वाघ याने लज्जा वाटेल असे कृत्य केले. त्याचप्रमाणे दमदाटी करुन अतिप्रसंग करुन धमकी दिली.

त्याचप्रमाणे साक्षीदार महिलेस देखील तुझ्या मुलीला सोडणार नाही, असे सांगून धमकावले. या घटनेचा पुढील तपास पोसई ए.के.पाटील करीत आहेत.

महिलेचा छळ; पाच जणांवर गुन्हा – महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करुन मारहाण केल्याप्रकरणी बडोदा येथील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फिर्यादी सौ.सरला गोकुळ पवार, रा.वार, ता.जि.धुळे या महिलेने याबाबत पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार गोकुळ हिरामण पवार, हिरामण दोधू पवार, शकुंतला हिरामण पवार, दीपक हिरामण पवार, पुष्पा शिवाजी सोनवणे यांच्यावर भादंवि कलम 498 (अ), 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मारहाणप्रकरणी गुन्हा – किरकोळ कारणावरुन झालेल्या मारहाणीत एक जण जखमी झाला. दंडेवालेबाबा नगरमध्ये ही घटना घडली. चंद्रशेखर भटू गायकवाड, रा.दंडेवालेबाबा नगर, मोहाडी यांना शिवीगाळ करुन दमदाटी केली.

तसेच हत्याराने मानेवर वार करुन जखमी केले. म्हणून विक्की नारायण चौधरी, रा.मोहाडी उपनगर याच्याविरुध्द मोहाडी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

काळ्या बाजारात जाणारा गहू पकडला – रेशनचा गहू काळ्या बाजारात जादा भावाने विक्री करण्यासाठी घेवून जात असताना भटेसिंग लालसिंग गिरासे यांना रंगेहात पकडण्यात आले.

प्लास्टीकच्या दोन गोण्यांमध्ये हा गहू आढळून आला. शिंदखेडा शासकीय गोडावूनमधून गहू नेला जात होता. या प्रकरणी विजयसिंग नथ्थेसिंग राजपूत, रा.शिंदखेडा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मोटारसायकल अपघातात महिला ठार – मोटारसायकल अपघातात शिंदखेडा तालुक्यातील खर्दे येथील आशाबाई रणजितसिंग गिरासे (वय 42) या महिलेचा मृत्यू झाला.

गतिरोधकावर मोटारसायकल आदळून झालेल्या अपघातात आशाबाई गंभीर जखमी झाल्या होत्या. दोंडाईचा येथील पारख हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत रितेश अंबालाल गिरासे यांनी दोंडाईचा पोलिसात फिर्याद दिली.

सर्पदंशाने मृत्यू – शेतात बैलांना चारापाणी करत असताना सर्पदंश होवून कैलास धनगर (वय 45), रा.ह.मु.मालपूर, ता.शिंदखेडा यांचा मृत्यू झाला.

त्यांना दोंडाईचा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

 

LEAVE A REPLY

*