Type to search

अभय महाविद्यालयाच्या प्राचार्यांना खंडणीसाठी धमकी

maharashtra धुळे

अभय महाविद्यालयाच्या प्राचार्यांना खंडणीसाठी धमकी

Share
धुळे । येथील अभय महाविद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र माळी खंडणीसाठी धमकी देण्यात आली आहे. मोबाईलवरून चार लाख रूपये खंडणीची मागणी करून पैसे दिले नाही तर जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वेगळवेगळ्या तीन मोबाईल क्रमांकावरून धमकी देणार्‍या विरूध्द पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्राचार्य रामचंद्र अर्जुन माळी (वय 61 रा. प्लॉट नं. 24 भरत नगर, देवपूर, धुळे) यांनी पश्चिम देवपूर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांना दि. 20 एप्रिल 2019 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास वेगवेगळ्या तीन मोबाईल क्रमांकावरून अनोळखी इसमांसह निलेश निंबा पाटील (रा. निमझरी नाका, शिरपूर) याने मोबाईलवर फोन करून चार लाख रूपये खंडणीची मागणी केली. पैसे दिले नाही तर जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दोन मोबाईलक्रमांकासह एक मोबाईल क्रमांक धारक निलेश निंबा पाटील यांच्याविरूध्द भादंवि कलम 387, 507 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक एच. डी. बहिर हे करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!