धुळ्यात आठ जुलैला राष्ट्रीय लोक अदालत – न्या. जे.ए.शेख

0
धुळे । दि.24 । प्रतिनिधी-जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून धुळे येथे 8 जुलै रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, न्या. जे. ए. शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समुपदेशक डॉ. योगेश सूर्यवंशी उपस्थित होते. न्या. शेख यांनी सांगितले, आर्थिक किंवा इतर कारणांमुळे नागरिकांना न्याय नाकारला जाऊ नये म्हणून सर्वांसाठी न्याय हा यामागचा मूळ उद्देश आहे.

प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे केवळ मानवी हक्क, मागण्या अथवा केवळ नागरी अथवा राजकीय अधिकार या घटकांपुरता एखाद्या व्यक्तीचा आत्मसन्मान मर्यादित नाही, तर त्यात आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकारांचाही समावेश होतो.

भारतीय संविधानाचे पालन करताना न्याय प्रक्रियेत सर्वांसाठी समता आणि निष्पक्षपातीपणाची हमी घेत योग्य, व्यावहारिक आणि सकारात्मक पावले उचलणे, हे विधी सेवा प्राधिकरणाचे उद्दीष्ट असून त्याच्या पूर्ततेच्या दिशेने कल राहणे अपेक्षित आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून गरजूंना विधी साहाय्य केले जाते. त्यात खटला दाखल करण्यापासून ते त्याचा निकाल लागेपर्यंत विधी साहाय्य केले जाते.

दर मंगळवारी पती- पत्नी यांचे समुपदेशन करुन त्यांच्यातील तक्रारींचे निवारण केले जाते. बहुतांश केसेसमध्ये समुपदेशानंतर समझोता घडून येतो.

शासनाच्या योजना, आदिवासी हक्कांचे संरक्षण याविषयी मार्गदर्शन केले जाते, असेही न्या. शेख यांनी सांगितले.

 

 

LEAVE A REPLY

*