धुळ्यातील त्या राजकीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू

धुळ्यातील त्या राजकीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू

भोला बाजार परिसररात किरकोळ दगडफेक

पोलिसांचा सौम्य लाठीमार

धुळे- धुळ्यातील त्या 43 वर्षीय राजकीय व्यक्तीचा अखेर आज मृत्यू झाला असून वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी यांनी यास दुजोरा दिला आहे.
यानंतर 80 फुटी रस्त्यालगत च्या भोला बाजार परिसरात काही नागरिकांनी एकत्र येऊन गर्दी करीत शासकीय वाहनांवर दगडफेक केली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगविले.
एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यास कोरोना झाल्याचे निपन्न झाल्याने खळबळ उडाली होती. या व्यक्तीच्या कुटुंबियांना आणि कार्यकर्त्यांना कोरोनटाइन करण्यात आले आहे. त्याचा शहराचे आमदार डॉ फारूक शाह यांच्याशी थेट सबंध असल्याने त्यांनाही कोरोंटाइन करण्यात आले आहे.
आज सकाळी 9.30 वाजता या 43 व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या नातेवाइकांनी भोला बाजार परिसरात गर्दी करून किरकोळ दगडफेक केली.
मनपाने निर्धारित केलेल्या वडजाईरोड परिसरातील कब्रस्तान मध्ये मृताचा दफनविधी करण्यात येणार असून त्यासाठी मोजक्याच व्यक्तींना उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com