पीक विमा व इतर अनुदानाची रक्कम कर्ज खात्यावर टाकू नका !

0
धुळे । दि.3 । प्रतिनिधी-धुळे जिल्ह्यात पीक विम्यापोटी व इतर अनुदानाच्या शेतकर्‍यांच्या रक्कमा कर्ज खात्यावर परस्पर जमा करण्यात येत आहे.
ज्या गावांची आणेवारी 50 पैशाच्या आत आहे, अशा गावातील शेतकर्‍यांची अनुदाने कर्ज खात्यावर जमा करण्यात येऊ नयेत, अशी मागणी जिल्हा काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, धुळे जिल्ह्यात पीक विम्यापोटी व इतर अनुदानाच्या शेतकर्‍यांच्या रक्कमा कर्ज खात्यावर परस्पर जमा करण्यात येत आहे.

ज्या गावांची आणेवारी 50 पैशाच्या आत आहे, अशा गावातील शेतकर्‍यांची अनुदाने कर्ज खात्यावर जमा करण्यात येऊ नयेत, अशा शासनाचा स्थायी आदेश आहे.

परंतु धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकामध्ये सर्रास शेतकर्‍यांची अनुदाने कर्ज खात्यात जमा करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांचेही याबाबत लक्ष वेधण्यात आले आहे.

परंतु तरीही राष्ट्रीयकृत बँकांकडून शासनाच्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे. धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकेकडून होत असलेला अन्याय त्वरित दूर व्हावा व शासनाच्या आदेशानुसार अनुदानाच्या परस्पर कर्ज खात्यात न जमा करता, शेतकर्‍यांच्या बचत खात्यावर जमा करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना सूचना द्याव्यात, अशी मागणी आ.कुणाल पाटील, आ.काशिराम पावरा, आ.डी.एस.अहिरे, प्रकाश पाटील, शाम सनेर यांच्या स्वाक्षर्‍या आहे.

 

LEAVE A REPLY

*