Type to search

maharashtra आवर्जून वाचाच धुळे मुख्य बातम्या

धुळे जि.प.सीईओ गंगाथरन यांची बदली?

Share
धुळे | जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. गंगाथरन यांची जळगाव जिल्हाधिकारीपदी बदली झाली असून त्यांच्या जागी जालना जि.प.च्या सीईओ निमा अरोरा यांची नियुक्ती झाल्याचे वृत्त आहे. परंतु या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान डी. गंगाथरन यांच्या बदलीबाबत सोशल मीडियावर चर्चेला ऊत आला आहे.

डी. गंगाथरन यांची जळगाव जिल्हाधिकारीपदी बदली झाल्याचे वृत्त आहे. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असतांना जि.प.च्या कर्मचारी व अधिकार्‍यांना शिस्त लावली होती. तसेच स्वच्छतेचे धडेही दिले होते. जिल्हा हागणदारी मुक्त होण्यासाठी डी. गंगाथरन यांनी अतोनात परिश्रम घेतले.

डी. गंगाथरन यांच्या जागी जालना येथील सीईओ निमा अरोरा यांची नियुक्ती झाल्याचे वृत्त आहे. निमा अरोरा या मध्यमवर्गीय कुटुंबातील असून गेली ३१ वर्ष त्यांचे कुटुंब दिल्लीत येथे वास्तव्याला आहे. त्यांना दोन मोठ्या बहिणी असून त्यांच्या कुटुंबात सरकारी क्षेत्रात कोणीही नोकरीला नाही.

निमा अरोरा यांना युपीएससी परीक्षेत २०१३ मध्ये यश मिळाले असून आयएएस मध्ये देशात त्यांनी ५० वी रॅक मिळविली होती. ३० वर्षीय अरोरा या सध्या जालना येथे गेल्या दहा महिन्यापासून मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी नंदूरबार येथील सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी आयएएस पदवी मिळाल्यानंतर नंदुरबारची त्यांची पहिलीच नियुक्ती होती.

दरम्यान डी. गंगाथरन व निमा अरोरा यांच्या बदलीबाबत सोशल मीडियावर संदेश आज दिवसभर फिरत होता. सायंकाळनंतर मात्र या दोघांच्या बदलीबाबत चर्चेला सोशल मीडियावर ऊत आला होता.

माझी बदली झालेली नाही!
जळगाव जिल्हाधिकारीपदी माझी बदली झालेली नसून बदलीबाबत कुठलेही आदेश मला प्राप्त झालेले नाहीत. तसेच माझ्या नियुक्तीच्या ठिकाणी देखील कोणाचीही बदली झालेली नाही.
– डी.गंगाथरन, सीईओ धुळे

कुठलेही आदेश प्राप्त नाही!
बदलीची माहिती सोशल मिडीयातुनच कळत आहे. मात्र बदलीबाबत आज सायंकाळी उशिरापर्यंत कुठलेही आदेश प्राप्त झाले नसल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दै. देशदूतशी बोलतांना दिली.
– किशोर राजे-निंबाळकर, जळगाव

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!