Type to search

Breaking News maharashtra धुळे मुख्य बातम्या

धुळे दुर्घटना : मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातलगांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर

Share

धुळे : वाघाडी गावाजवळील एमआयडीसी केमिकल कंपनीत आज सकाळी भीषण स्फोट झाला. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या नातलगांना ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे.

दरम्यान माहिती अशी कि आज सकाळी शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावाजवळील केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाल्याने १२ जणांचा मृत्यू झाला. तर तब्बल ५० हुन अधिकजण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाचा हादरा इतका तीव्र होता की यामुळे केवळ कंपनीतील कर्मचाऱ्यांनाच नाही तर शेजारील शेतात काम करत असणाऱ्या शेतकरी देखील गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांसाठी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करून त्यांचे सांत्वन केले आहे.

तसेच पालकमंत्री दादा भुसे यांनी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी जखमींची विचारपूस करून जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार असल्याचे सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!