Type to search

Featured धुळे फिचर्स

गरम पाणी अंगावर पडल्याने बालकाचा मृत्यू

Share

धुळे  – 

खेळतांना पातेल्यात ठेवलेले गरम पाणी अंगावर पडल्याने अडीच वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची हद्यद्रावक घटना देवपूरात घडली. उपचारादरम्यान त्याचा काल मृत्यू झाला.

याबाबत देवपूर पेालिसात नोंद करण्यात आली आहे. घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे कार्तिकेय मनिष चव्हाण (वय रा. प्लॉट न. 83, तिरूपती नगर, देवपूर, धुळे) असे बालकाचे नाव आहे.

घरी दि. 10 रोजी दुपारी नागलीचे पापड तयार करण्याचे काम सुरू होते. त्यासाठी पातेल्यात गरत पाणी ठेवलेले होते. घरात कार्तिकेय खेळत असतांना ते गरम पाणी त्यांच्या अंगावर पडल्याने त्याला शहरातील खाजगी रूग्णालयात दाखल केले.

तेथुन नाशिक येथे खाजगी रूग्णालयात नेले. नंतर आणखी दुसर्‍या रूग्णालयात हलविण्यात आले. तब्बेत बरी नसल्याने त्याला काल दि. 14 रोजी धुळे येथे घेवून येत असतांनाच अखेर रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!