Type to search

Breaking News धुळे

धुळ्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देवू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Share

धुळे | प्रतिनिधी –

धुळे शहर आखीव- राखीव असून शहराची रचना सर विश्‍वेश्‍वरैया यांनी केली आहे. पंरतू मधल्या काळात शहराच्या विकासासाठी निधी मिळाला नाही. परंतू भविष्यात शहराच्या विकासाठी मोठ्या प्रमाणात निधी देवू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी पत्रपरिषदेत दिले.

भाजपाच्या महाजनादेश यात्रेच्या दुसर्‍या टप्प्याला काल धुळे शहरापासुन सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेनंतर आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा खा.डॉ.सुभाष भामरे, महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, महापौर चंद्रकात सोनार आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, शहरा विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमात निधी दिला आहे. याबरोबच अक्कलपाडा धरण, वाडी-शेवडी प्रकल्प, मनमाड-इंदूर रेल्वे मार्गामुळे धुळे जिल्हा समृध्द होईल. यासह तापी मेघा रिचार्ज प्रकल्पासह इतर प्रकल्पामुळे उत्तम महाराष्ट्रातील अनियमिता दुर होईल.

मनमाड-इंदूर रेल्वेमर्गाचे भुसंपादन सुरू सुरू आहे. धुळे शहर मध्यवर्ती केंद्र आहे. परंतू कनेक्टीव्ही थांबली होती. आता रेल्वे मार्गामुळे व डीएमआयसीमुळे जिल्ह्याचा फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.

पंधरा दिवसात आयुक्तांची नियुक्ती

– धुळे महापालिकेत गेल्या दोन ते तीन महिन्यापासुन आयुक्त नाही. तुम्हाला टिकणारे आयुक्त द्यायचे आहेत. येत्या पंधरा दिवसात आयुक्तांची नियुक्त करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री  फडणवीस यांनी सांगितले.

आता अनेकांना यात्रा काढण्याचा उत्साह

आम्ही महाजनादेश यात्रा सुरू केल्यानंतर अनेकांना यात्रा काढण्याचा उत्साह आला, असल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांना लगावला. आम्ही महाजनादेश यात्रा काढल्यानंतर अनेक पक्षांना यात्रा काढण्याचा उत्साह आला आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. पण खरतर यात्रा काढण्याची परंपरा ही भाजपाची आहे. आम्ही विरोधात असतांना संघर्ष यात्रा काढली होती. आता आम्ही संवाद यात्रा काढत आहोत. आमच्या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच हे सरकारच आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकते, असा विश्वास लोकांच्या मनात दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!