Type to search

Breaking News Featured धुळे मुख्य बातम्या

धुळ्यात वादग्रस्त फेसबुक पोस्ट लिहिणाऱ्यास ठोकल्या बेड्या

Share

नाशिक | प्रतिनिधी

अयोध्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल राममंदिराच्या बाजूने आला. सगळीकडे शांततेचे आवाहन करण्यात आले असताना धुळ्यात या शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला. या व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धुळ्यातील आझादनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळ्यातील गोरक्षक संजय रामेश्वर शर्मा या नावाच्या व्यक्तीकडून फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट लिहिण्यात आली होती. राम जन्मभूमी, बाबरी मशीद या वादग्रस्त प्रकरणाचा अंति निकाल जाहीर होणार असल्याच्या अनुषंगाने त्याचे संजय शर्मा या नावाचे फेसबुक अकाऊंटवरून श्री राम मंदिर भुमीस न्याय मिळताच मी दिपावळी साजरी करणार एक कलंक मिटेल इतिहासाचा..

अशी मराठीत पोस्ट केली. या पोस्टमुळे हिंदू मुस्लिम समाजामध्ये द्वेषाची भावना आणि तेढ निर्माण करण्याच्या हेतूनेच प्रयत्न करण्यात आल्यामुळे या प्रकरणी संजय शर्माला अटक केली आहे. संजय शर्माविरोधात आझाद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासोबतच सोशल मीडियावर अफवा पसरवू नये असे नागरिकांना आवाहन केले जात असतना अशी घटना घडल्यामुळे या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!