बोरविहीर येथे स्व.नामदेव खंडेराव पाटील वाचनालयाचे जळगाव जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्याहस्ते उद्घाटन

0
बोरविहीर । दि.29 । वार्ताहर-येथील स्व.नामदेव खंडेराव पाटील सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाचे उद्घाटन जळगावचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पाढंरपट्टे, प्रमुख पाहुणे डी.गंगाधरन, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. धुळे, एम.राम कुमार जिल्हा पोलीस अधीक्षक धुळे, जीवन सोनवणे आयुक्त जळगाव, दिपस्तंभ फाऊंडेशनचे यजुर्वेद्र महाजन, सरपंच स्मीता ठाकरे, उपरसपंच काशिनाथ गवळी आदींसह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

डी.डी. सोनवणे इंजिनियर, तलाठी, ग्रामसेवक इत्यादी उपस्थित होते. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, यजुर्वेद्र महाजन, जीवन सोनवणे यांच्या हस्ते वाचनालयाच्या प्रांगणात वृक्षलागवड करण्यात आली.

मान्यवरांचा सत्कार आयुक्त जीवन सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. सरपंच स्मीता ठाकरे यांनी सत्कार केला. विद्यालय बोरविहीरच्या वतीने संचालक प्रकाश सोनवणे यांनी मान्यवरांचा सत्कार केला.

प्रास्ताविक मुख्याध्यापक शरद बाजीराव पाटील यांनी केले. स्व.नामदेव खंडेराव पाटील, वाचनालयाच्या माध्यमातून पंचक्रोशितील युवा-युवती नागरिकांमध्ये जीवनदायी बदल होईल असे सांगितले.

दिपस्तंभ फाउंडेशनचे यजुवेंद्र महाजन यांनी यावेळी मार्गदशगर्णन केले. वाचनालय नॉलेज सेंटर, िउजीटल रिडींग, व्हीडीओ कॉन्फ्रन्स द्वारा मार्गदर्शन करण्याचे अश्वासन दिले. त्यासाठी स्वयस्फुर्तीने 2.5 लाख रुपये जमा झाले.

 

LEAVE A REPLY

*