Type to search

बोराडीतील भोंगर्‍या बाजारात लाखोंची उलाढाल

maharashtra धुळे

बोराडीतील भोंगर्‍या बाजारात लाखोंची उलाढाल

Share
बोराडी । वार्ताहर- शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे दि.14 मार्च रोजी आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे दर्शन घडवून देणारा भोंगर्‍या बाजारी अतिशय शांततेत व मोठ्या उत्सवात साजरा करून या बाजाराचा समारोप झाला.

या भोंगर्‍या बाजारात सुमारे पंचवीस ते तीस लाखांची उलाढाल झाली आहे. होळी हा सण आदिवासींचा महत्वाचा सण असून आदिवासी आपला पारंपारिक असा होळी सणासाठी तीरकामठा, बुधे, भोपळे घुंगरू डफ, मोठे ढोल, बाडे, झांज, बासरी आदि साहित्याची जमवा-जमव करतांना दिसून येत आहेत.

या भोंगर्‍या बाजारात किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांनी हजेरी लावून मानाचा ढोल वाजवून पूर्ण भोंगर्‍या बाजारात व आदिवासी बांधवामध्ये ठेका धरून नाचल्यामुळे आदिवासी बांधवांनी कौतुक केले. बोराडी येथील भोंगर्‍या बाजाराचा यंदा पहिला मान कोडीद व उर्मदा गावाचा होता. बोराडीचे उपसरपंच तथा भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांच्या हस्ते मानाच्या ढोलचे पूजन शिवाजी चौकात करण्यात आले. याप्रसंगी किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे, ग.स.बँकेचे माजी चेअरमन निशांत रंधे, शामकांत पाटील, विजय बाफना, शंशाक रंधे, नंदू जगताप, संजय जगदेव, विजय देवरे, राज निकम, भागवत पवार, प्रमोद पवार, संजय जगदेव, तुषार सत्यविजय, नितीन पाटीले, बबन पाटील, सुनील पावरा, नागेश पावरा, किशोर भदाणे, उमर्दाचे सरपंच रमेश वसावे, सामाजिक कार्यकर्ते रवी वसावे, आकाश वसावे,महेंद्र तडवी, मनिलाल भामरे, खंडू गुलवणे, दिलीप वसावे, साहेबराव वसावे, कोडीदचे सरपंच भरत पावरा, मगन पावरा, कांतिलाल पावरा, बापू पावरा,व कोडीद बुडकी, नवागाव, उमर्दा, वकवाड, मालकातर, धाबापाडा, न्यू बोराडी आदी वीस ते पंचवीस गावातील पाटील, पोलीस पाटील, सरपंच उपस्थित होते.

या उत्सवाला मध्य प्रदेशातील व परिसरातील, 60 ते 70 गावातील आदिवासींनी हजेरी लावली. सांगवी रस्ता ते पानसेमल रस्ता व शिरपूर रस्त्यावर एक किमी. पर्यंत व्यावसायाची दुकाने थाटण्यात आले होते. तसेच त्या-त्या गावातील प्रमुख आपल्या बरोबर ढोल वाजंत्री (काश्याचे भांडे) सह बोराडी येथे वाजत-गाजत नृत्य केले. गुलाल्या बाजार, भोंगर्‍या बाजार हा स्वतंत्रपणे चालणार्‍या या उत्सवाची सांगता होते न होते तोच होळी उत्सवाला प्रारंभ होतो. या भोंगर्‍या बाजारासाठी तालुक्यातून तसेच मध्यप्रदेशातून अनेक व्यावसायीकांनी हजेरी लावली होते. भोंगर्‍या बाजारात वेगवेगळ्या प्रकारची दुकाने थाटण्यात आली होती. तसेच होळी सणाला लागणारे पूरक साहित्य विक्री करणारे व्यावसाहिक देखील मोठ्या प्रमाणात होते.यात भोपळे, घुंगरू, डफ, ढोल, बाजे, झांज , बांसरी आदि साहित्य विक्रीसाठी मध्यप्रदेशातून आले होते तसेच विविध प्रकारचे आभुषणे,दैनदिन जीवनात उपयोगी ठरणारी मातीची भांडी, तसेच बाजारात सर्वात मोठ्या प्रमाणात दाळ्या,फुटाणे, गुळ,खोबरे इ.होळी उपयोगी पारंपारिक साहित्यांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!