बोराडी येथील कब्रस्तानात वृक्षारोपण

0
बोराडी । दि.18 । वार्ताहर-बोराडी येथील दाऊदी बोहरा समाजाच्या वतीने मुस्लीम कब्रस्तानात विविध जातीचे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमांचा शुभारंभ भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन करण्यात आले.
बोराडी येथील मुस्लीम कब्रस्तानात दाऊदी बोहरा समाजाच्या वतीने विविध जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
या प्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे, शेख अलीअसगर साकीर, आबीद बोहरी, असगर बोहरी, खुजमा बोहरी, शेख युनुस, मुस्लीम मौलाना आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांच्या प्रयत्नाने मुस्लीम कब्रस्तानाचे सुशोभीकरण करण्यात आले. व आता मुस्लाीम कब्रस्तान परिसरात वृक्षारोपण करुन परिसर हिरवागार करण्याचा मानस असून त्यांनी गांवातील सार्वजनिक ठिकाणी, गल्ल्यामध्ये, शाळेत, मंदिर परिसर, अमरधाम, कब्रस्तान, रस्त्यांच्या दोन्ही बाजूला तसच जवळपासच्या जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे आवाहन बोराडीसह परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*