मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया अनुदान योजना सुरु

0
धुळे । दि.1 । प्रतिनिधी-राज्यात मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली असून सदर योजना सन 2017-18 या आर्थिक वर्षापासून पुढील पाच वर्षासाठी राबविण्यात येणार आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टी धुळे महानगर उद्योग आघाडीचे संयोजक जी.बी.मोदी यांनी दिली आहे.
केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय अन्न प्रक्रीया अभियान या योजनेमध्ये शासनाचा सहभाग बंद झाल्यामुळे राज्य योजनेद्वारे अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यात आली आहे.

शेती मालाचे मुल्यवर्धन करणे शेतकर्‍यांच्या सहभागाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत प्रकल्प स्थापित करण्यात प्रोत्साहन देणे, उत्पादीत अन्न पदार्थांचे गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, उर्जेची बचत व्हावी यासाठी प्रकल्पाच्या आधुनिकीकरणास प्रोत्साहन देणे, अन्न प्रक्रीयेद्वारे उत्पादीत मालाची ग्राहकांमध्ये पसंती निर्माण करणे, बाजारपेठ निर्माण करणे व निर्यातीस प्रोत्साहन देणे, मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रियेसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मित करणे, ग्रामीण भागात लघु व मध्यम अन्न प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य देणे आणि रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देणे, राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियांतर्गत मंजूर, भौतिक दृष्ट्या उत्पादन सुरु असलेल्या तथापी अनुदान प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना उर्वरीत दये 738.92 लाग उर्वरीत अनुदान अधिक 34.54 लाख प्रशासकीय खर्च असे एकूण 773.46 लाखच्या मर्यादीत अनुदानाची रक्कम मंजूर करणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. असे श्री. मोदी यांनी सांगितले.

सदर योजना सन 2017-18 पासून प्रथम पाच वर्षासाठी प्रस्तावित करण्यात येत असून त्यानंतर योजनेच्या मुल्यमापन अहवालाच्या आधारावर सदर योजना पुढे सुरु ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. असेही मोदी यांनी सांगितले.

या योजनेचे चार उपघटकांमध्ये समावेश करण्यात आले आहे. त्यात कृषि व अन्न प्रक्रिया प्रस्थापना, स्तरवृत्ती व आधुनिकीकरण, शीतसाखळी योजना आणि मनुष्यबळ निर्मिती व विकास योजना यांचा समावेश आहे. असेही श्री. मोदी यांनी सांगितले.

योजनेत समाविष्ट बाबी
शेतमालचे मुल्यवर्धन करण्यासाठी शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत फलोत्पादने व खाद्यान्न व तेलबिया इत्यादी शेतमालासाठी अन्न प्रक्रीया प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहन अनुदान देणे यासाठी फळे व भाजीपाला सारख्या नाशवंत शेतमालाच्या प्रक्रियेच्या प्रकल्पांना प्राधान्य देणे, फलोत्पादने व खाद्यान्न, तेलबिया इत्यादी शेतमालासाठी अन्न प्रक्रिया प्रकल्पांशी निगडीत व प्रक्रिया केंद्र शीतसाखळी निर्मितीच्या प्रकल्पास अर्थसहाय्य देणे, अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी सेंट्रल फ्रूड टेक्नोलॉजिकल, इन्स्टिट्युट, नॅशनल इन्स्टिट्युट ऑप फ्रुड टेक्नॉलॉजी इंटरप्रेनरशीप अ‍ॅण्ड मॅनेजमेंट, स्टेट अ‍ॅग्रीकल्चर युनिव्हसीटीज इत्यादी केंद्र व राज्य संस्थांकडून प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मित करणे, राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियान अंतर्गत मंजूर भौतिक दृष्ट्या उत्पादन सुरु असलेल्या तथापी अनुदान प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना उर्वरीत अनुदानाची रक्कम मंजूर करणे.

 

 

LEAVE A REPLY

*