धुळ्यात मध्यवस्तीत दारु दुकाने देवू नयेत

0
धुळे । दि.20 । प्रतिनिधी-शहरात मध्यवस्तीत दारु दुकांनाना परवाना देवू नयेत, असे साकडे भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांना घातले. आज भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
शहरातील देवपूर परिसरात कुणाल बार व प्रिन्स वाईन शॉप हे मध्यवस्तीत दुकाने आहेत. याविरुध्द महिलांनी गेल्या 15 दिवसांपासून आंदोलन सुरु केले होते. रात्री दुकानासमोर भजन आंदोलन केले जात होते.

आज भाजपा नगरसेविका वैभवी दुसाने, सुनील नेरकर, योगेश मुकुंदे, अमित दुसाने, भारती माळी, मेघल चौधरी, मनिषा चौधरी, वंदना विश्वकर्मा, बबीता हिरे, वैशाली पाटील, सिमा सोनार, अविनाश पाटील, प्रशांत जोशी, सागर कोडगिर यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व मध्यवस्तीत असलेली दारुची दुकाने बंद करावीत, असे साकडे घातले.

 

LEAVE A REPLY

*