Type to search

maharashtra आवर्जून वाचाच धुळे मुख्य बातम्या

पुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन

Share
धुळे । धुळे तालुका आणि संपूर्ण लोकसभा मतदार संघात विकासाच्या कामाला सर्वात जास्त महत्व दिले, न केलेल्या कामाचे श्रेय घेणे हे माझ्या स्वभावात आणि तत्वात नाही. जे काम केले ते जनते समोर आहे. परंतु आज श्रेयासाठी विरोधकांची लढाई सुरू आहे. असा टोला संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांनी विरोधकांना लगावला.

धुळे तालुक्यातील शिरूड येथे बोरी पाच कोटी 50 लाख निधीतून नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचे तसेच शिरूड गावात खासदार विकास निधीतून 10 लाखांच्या रस्ता कॉक्रिटिकरण कामाचे लोकार्पण आज ना. डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ना. डॉ. भामरे बोलत होते. यावेळी धुळे तालुक्यातील जेष्ठ नेते गजाननबापू पाटील, युवानेते राम भदाणे, भाजपा तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील, आशितोष पाटील, भाजपा धुळे तालुका सरचिटणीस अनिल जयस्वाल, शिरूडचे उपसरपंच डॉ. निलेश पितृभक्त, खोरदडचे सरपंच विठाबाई देवरे, वेल्हाणेचे सरपंच विद्या बोरसे, खोरदडचे सरपंच भैया अभिमन्यू पाटील, डॉ. पाटील, डॉ. मुकेश पाटील, अशोक कोठावदे, प्रकाश कळवाणी, सुभाष कळवाणी, वाल्मिक वाणी, नाणेचे सरपंच अभय राजपूत आदि मान्यवर उपस्थित होते.

धुळे तालुक्यातील शिरूड ते खोरदड दरम्यान बोरी नदीवर पूल उभारण्याच्या कामासाठी ना. डॉ. सुभाष भामरे यांनी पाठपुरावा करून पाच कोटी 50 लाखांचा निधी मंजूर करून घेतला होता. या निधीतून शिरूड ते खोरदड पुलाचे काम पूर्ण झाले आहे तसेच या कामामुळे शिरूड, खोरदड, धाडरी, नाणे, वेल्हाणे आणि पंचक्रोशीतील गामस्थांना मोठा लाभ मिळणार आहे. त्या सोबतच शिरूड गावात अंतर्गत रस्ते निर्मिती साठी 10 लक्ष रुपयांचा निधी ना. डॉ. सुभाष भामरे यांनी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे शिरूड ग्रामस्थांना चांगले रस्ते मिळणार आहे.

ना.डॉ.भामरे यांचेच पुल मंजुरीचे श्रेय
शिरुड ते खोरदड रस्त्यावर बोरी नदीवर पुलाची मागणी बर्‍याच वर्षापासून शिरुड आणि बोरी परीसरातील नागरीकांची होती. परंतु दुर्दैवाने तात्कालीन कुठल्याच लोकप्रतिनिधींनी जनतेच्या मागणीकडे लक्ष दिले नाही. परंतु बोरी परिसरातील नागरिकांनी ना. डॉ. भामरे यांच्याकडे पुलाची मागणी केली. व पुल मंजूर केला. त्यामुळे पूल मंजूर करण्याचे श्रेय डॉ. सुभाष भामरे यांचे आहे. काँग्रेस आमदारांनी जनतेची दिशाभूल करू नये. ना. डॉ. सुभाष भामरे यांनी मंजूर केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा ते केवीलवाना प्रयत्न आमदार करत आहेत. तरी हे श्रेय भारतीय जनता पार्टीचे व ना. डॉ. सुभाष भामरे यांचे आहे असे पत्रक धुळे तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष देवेंद्र पाटील, भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मनोहर भदाणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अरविंद जाधव, किशोर सिंघवी, बापूसाहेब खलाणे आणि भाऊसाहेब देसले यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

धुळे । भूमीपूजन काय करता आधी देशाचे संरक्षण करा, सीमेवर आपले सैनिक शहीद होत असतांना संरक्षण मंत्री न केलेल्या कामांचे भूमीपुजन करत फिरत आहेत. देशातील जनतेने जी जबाबदारी दिली आहे ती पार न पाडता खोटे आश्वासनांचा बाजार त्यांनी मांडला असल्याचा घणाघात धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी शिरुड येथे झालेल्या भूमीपुजन कार्यक्रमात केला.

आ.कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून शिरुड येथे बोरी नदीवर पुल मंजूर करण्यात आला आहे, या कामाचे आ.पाटील यांच्या हस्ते भूमीपुजन करण्यात आले. यावेळी बोलतांना आ.कुणाल पाटील म्हणाले की, अधिवेशन काळात अर्थकल्पात बोरी नदीवर पुला व्हावा म्हणून त्याचा समावेश करुन घेतला. तत्पूर्वी या कामासाठी ना.चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्र्यांकडे अनेकवेळा पाठपुरावा करुन पुलासाठी प्रयत्न केले होते. राज्यात विधानसभेत मंजुर होणारे कामाचे श्रेय देशाचे संरक्षण मंत्री घेतात आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भूमीपुजन करतात. खर तर ही तालुक्यात आता हास्यास्पद विषय झाला आहे. धुळे लोकसभेतील जनतेने दिल्लीच्या कामासाठी निवडून दिले आहे. आणि देशाने त्यांच्यावर संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे.अशावेळी देशाची सीमा धोक्यात आहे, शेकडो सैनिक शहिद होत आहेत आणि इकडे संरक्षण मंत्री आम्ही मंजूर केलेल्या कामांचे भूमीपुजन करीत आहेत. गेल्या 16 फेबु्रवारी रोजी जळगाव, धुळे, यवतमाळ येथे पंतप्रधान मोदी यांचा दौरा होता.त्यामुळे शहिद जवानांचे पार्थिव तब्बल दोन तास अडवून ठेवण्यात आले होते अशावेळी शहिद जवानांपेक्षा मोदींचा दौरा महत्वाचा कसा वाटला? असा खडा सवालही आ.कुणाल पाटील यांनी यावेळी उपस्थित केला आहे. देशाचे माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने देशात दुखवटा जाहिर केला होता त्यामुळे मी धुळे ग्रामीणमधील सर्वच कार्यक्रम आठवडाभरासाठी रद्द केले होते. मात्र हेच भाजपचे संरक्षणमंत्री नगाव धमाण्याचे भूमीपुजन करीत होते. त्यावेळी तेथील लोकांना त्यांना रोखले. जनताच त्यांना त्याची जागा दाखविणार आहे, असा प्रहार आ. कुणाल पाटील यांनी केला.

जि.प.सभापती मधूकर गर्दे म्हणाले की, भाजपने देशाची दिशाभूल केली आणि संरक्षण मंत्री धुळे जिल्हयाची फसवणूक करीत आहेत. तरुणांना रोजगार नाही, शेतीमालाला हमीभाव नाही,त्यामुुळे देशातील जनता बेजार झाली असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला प्रमोद जैन, गुलाबराव कोतेकर, जि.प.सदस्या नर्मदाताई भिल, दुधसंघाचे चेअरमन वंसत पाटील, पं.स.उपसभापती दिनेश भदाणे, बुरझड सरपंच एन.डी. पाटील, संरपच पांडूरंग मोरे, जिजाबराव पाटील, ग्रा.पं.सदस्य आबा शिंदे,भटू चौधरी, उखनदादा खाटीक, सुभाष शिंदे, एकनाथ पवार, अर्जुन कोळी, देविदास चौधरी, संजय पाटील, बापू गायकवाड, रमेश पारधी, रामदास भोई, भास्कर सोनार, सहादु सरदार उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!