ग.स.बँक कर्मचारी संघटनेची स्थापना

0
धुळे । दि.16 । प्रतिनिधी – नाशिक विभाग कार्यक्षेत्र असलेल्या ग.स.बँकेच्या कर्मचार्‍यांची बैठक कल्याण भवन येथे निश्चित झाली. या बैठकीत ग.स.बँक कर्मचारी संघटना स्थापना करण्यात आली, अशी माहिती धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत देसले यांनी दिली आहे.
सदर बैठक राज्य कर्मचारी संघटनेचे सचिव डॉ.संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रत्नाकर वाघ, भारतीय मजदूर संघाचे प्रांत उपाध्यक्ष शिवाजीराव काकडे, सुनील देवरे, बी.एम.कुलकर्णी, घनश्याम जोशी, बँकेचे सोने तारण मॅनेजर नरेंद्र फटकाळ, वसुली मॅनेजर पी.के.महाजन आदी उपस्थित होते.
यावेळी ग.स.बँक कर्मचारी संघटना स्थापन करण्यात आली. कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत मोतीराम देसले यांची निवड करण्यात आली.
तर सरचिटणीसपदी सुरेंद्र प्रकाश काकडे, उपाध्यक्षपदी संजय सुकदेव अहिरे यांची निवड करण्यात आली.

सदस्यपदी गोपीचंद गायकवाड, रमाकांत खंडारे, सतीष माळी, वाल्मीक दराडे, गणेश देवरे, भाऊसाहेब भामरे (साक्री), लतीष पवार (शिंदखेडा), सतीष पवार (शिरपूर), कोमलसिंग राजपूत (नंदुरबार), रमेश पाटील (अमळनेर), विवेक साळुंखे (चाळीसगाव), विकास गायकवाड (नाशिक व नगर), प्रशांत देसले (मालेगाव), चंद्रसिंग नाईक (नवापूर) यांची निवड करण्यात आली.

यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगेश निकम, रावसाहेब साळुंखे, सचिन खंडारे, शशांक भामरे, कैलास राजपूत, लालचंद बोरसे, नवल वाघ, शशीकांत भदाणे, गुलाब माळी, यशवंत डोमाडे, राजेश माळी, मिलींद गायकवाड, गुणवंत देसले, चैत्राम पाटील, दिनेश पाटील, चेतन पाटील व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. आभार रमाकांत खंडारे यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

*