भंगार विक्रेत्यांवर गुन्हा दाखल; दहशतवादविरोधी पथकाची कारवाई

0
धुळे । दि.27 । प्रतिनिधी-नोटीसा देवूनही भंगार खरेदी-विक्रीबाबत माहिती न दिल्याने दोन व्यावसायिकांविरुध्द शिरपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पोकाँ प्रशांत सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भंगार स्क्रॅब विक्रीबाबत लायसन्स व परवानासंदर्भात पोलिसांत माहिती देणे बंधनकारक होते.

वकील अजीज तेली, रा.आनंदनगर, शिरपूर याने सदर माहिती मात्र पोलिसांत दिली नाही. या फिर्यादीवरुन वकील तेली याच्याविरुध्द भादंवि 188 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास हेकाँ पानपाटील करीत आहेत.

दुसर्‍या कारवाईत हेकाँ प्रेमसिंग सिसोदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रमेश पुंडलिक शिंपी, रा. कुंभारटेक, शिरपूर यांनीही सदरची माहिती दिली नाही म्हणून शिरपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

अपघातात तरुण ठार – सुरत-नागपूर महामार्गावरील दहिवेल गावाजवळ अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक तरुण ठार झाला असून एक जण जखमी झाला.

ही घटना दि.25 जून रोजी दुपारी चार वाजता घडली. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुध्द साक्री पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

राहूल महारु चौरे (वय 19), युवराज श्रावण चौरे (वय 19) दोघे राहणार आमलीपाडा, ता.साक्री हे मोटारसायकलने दहिवेलकडून आमलीपाडाकडे जात असताना पद्मावती पेट्रोलपंपाजवळ त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली.

यात राहूल चौरे हा ठार झाला. तर युवराज चौरे हा गंभीर जखमी झाला आहे. महारु चौरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहनधारकावर भादंवि 304 (अ), 279, 337, 338, 427, मोटार वाहन कायदा कलम 194, 134, 177 प्रमाणे गन्हा दाखल झाला असून पुढील तपास हेकाँ पाटील करीत आहेत.

महिलेला शिवीगाळ – शहरातील पद्मनाभ नगर येथे राहणार्‍या एका महिलेस किरकोळ कारणावरुन शिवीगाळ केल्याची घटना घडली. याप्रकरणी एकाविरुध्द शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पद्मा कन्हेयालाल मंदाण, रा.लाडकाना भवनशेजारी, धुळे या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार शहरातील पद्मनाभ नगर येथे रेशन घेण्यासाठी गेली असता त्याचा राग येवून पद्मा मंदाण या महिलेस गायकवाड नावाच्या इसमाने शिवीगाळ केली.

या फिर्यादीवरुन संशयित गायकवाड याच्याविरुध्द भादंवि 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास हेकाँ सोनवणे हे करीत आहेत.

वाहनाच्या धडकेत दोन जखमी – बाबरे, ता.दुळे गावाजवळ पिकअप वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने राजेंद्र रघुनाथमोरे (वय 42), रा.बाबरे व कैलास मोहर पाटील (वय 49), रा.वल्हाणे हे दोन जण जखमी झाले.

 

LEAVE A REPLY

*