राज्य अ‍ॅथलेटीक्स स्पर्धेसाठी पुरुष व महिला संघाची निवड

0
धुळे । दि.24 । प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य अ‍ॅथलेटीक्स असोसिएशनतर्फे श्री.शिवछत्रपती क्रीडा नगरी, बालेवाडी, पुणे येथे होत असलेल्या राज्यस्तरीय सिनियर अ‍ॅथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी धुळे जिल्हा पुरुष व महिला संघाची निवड चाचणी स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल येथे घेण्यात आली.
सदर स्पर्धेतून जिल्ह्याचा पुरुष व महिला संघाची निवड जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे करण्यात आली.

संघात मयुर काकडे (कर्णधार), महेश चव्हाण, नीलेश माळी, सोमनाथ पावरा, महेंद्र पावरा, रवींद्र पावरा, सुरेंद्र कोळी, अमोल पाटील, आकाश पाटील, भायला पावरा, गौरव पावरा, ज्ञानेश्वर माने, योगेश माळी, प्रितेश पाटील, अक्षय हिरे यांचा समावेश आहे.

तर महिलांमध्ये सुरेखा माळी, निकिता चौधरी, मोनाली वाघमोडे व रिना कोळी यांचा समावेश असून संघ प्रशिक्षक प्रमोद पाटील आहेत.

निवड झालेल्या संघाचे असोसिएशनचे अध्यक्ष माजी आ.राजवर्धन कदमबांडे, कार्याध्यक्ष संदीप बेडसे, सचिव प्रा.नरेंद्र पाटील, खजिनदार हेमंत भदाणे, योगेश वाघ, अमोल थोरात यांनी कौतुक केले आहे. या स्पर्धेचा समारोप दि. 25 जून रोजी होणार आहे.

 

 

LEAVE A REPLY

*