Type to search

धुळे फिचर्स

आर्वीच्या कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

Share

धुळे

तालुक्यातील आर्वी येथील दिपक रमेश घोरपडे (वय 42) या शेतकर्‍याने शेतात विष प्राषण केले. त्यानंतर त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

दि.25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास 13 वर्षाचा मुलगा रोशन हा शेतात गेला असता त्यास वडिल दिपक हे झाडाखाली झोपलेले अवस्थेत आढळून आले.

त्यांच्या शेजारी औषधाची व पाण्याची बाटलीही आढळल्याने त्याने काका अशोक घोरपडे यांना ही खबर दिली. त्यानंतर लगेचच अशोक घोरपडे हे गावातील दिलीप देसले, नागेश देवरे, संजय घोरपडे यांच्यासह अनकवाडी शिवारातील शेतात गेले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!