Type to search

धुळे

एपीआय दिलीप खेडकर निलंबित

Share

धुळे | सोनगीर पोलिस ठाण्याचे प्रभारी एपीआय दिलीप खेडकर यांनी कर्तव्यात कसूर, आवश्यक सूचनांचे पालन न करणे तसेच दंगा नियंत्रण साधनाबाबत अनास्था दाखविणे या विविध कारणांमुळे त्यांना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक छेरींग दोर्जे यांनी निलंबित केले आहे.

मुख्यमंत्री धुळे व नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर येत असल्याने या पार्श्‍वभूमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक दोर्जे हे काल दोंडाईचा, सोनगीर, नरडाणा मार्गावर पाहणीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी अचानक सोनगीर पोलिस ठाण्याला भेट दिली. या भेटीदरम्यान दोर्जे यांना सोनगीर पोलिस ठाण्यात अनेक त्रृटी आढळून आल्या. त्यामुळे खेडकर यांना निलंबित करण्याचे आदेश दोर्जे यांनी दिले. त्यांच्या जागेवर धुळे शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक सारिका कोडापे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी तात्काळ सोनगीर पोलिस ठाण्याचा पदभार घेतला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!