गुड्ड्या जिल्हा बँकेत कशासाठी येत होता ?

0
धुळे । दि.2 । प्रतिनिधी-मला माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी ललकारले आहे. मात्र मी त्यांना नऊ प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.
गुड्ड्या चोर जिल्हा बँकेत कशासाठी येत होता? याचे उत्तर त्यांनी द्यावेे, असे पत्रक आ.अनिल गोटे यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
पत्रकात आ. गोटे यांनी म्हटले आहे की,चार गुंड बदमाश पाळायचे अन् त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करायचं! हाच तुमचा धंदा आहे.

कदमबांडे यांना गुड्ड्या चोरसंबंधी मी नऊ मुद्यांची माहिती मागितली होती. पण त्याबद्दल एक शब्दही न बोलता किंवा मी उपस्थित केलेल्या नऊपैकी एकाही माहितीचा त्यांनी इन्कार केला नाही.

मी कुठलेही अवघड प्रश्न विचारीत नाही. गुड्ड्या चोर महापालिका वसुली विभाग जळीत कांडानंतर मिळालेल्या जामीनानंतर सुटून बाहेर आला.

त्या दिवसापासून तर त्याची हत्या होईपर्यंत तो तुम्हाला किंवा तुम्ही त्याला किती वेळा भेटलात? तो तुम्हाला किती वेळा भेटायला आला? गुड्ड्या चोर जिल्हा बँकेत अध्यक्षांच्या कार्यालयात कशासाठी येत होता?

पालिकेच्या वसुली विभागाचे शंभर वर्षाचे जुने रेकॉर्ड असलेले सगळी कागदपत्रे ज्या सराईत गुन्हेगाराने जाळून खाक केली, अशा समाजकंटक व समाजद्रोही नामचीन गुन्हेगाराच्या असंख्य भेटीमागील नेमके कारण काय?

गुड्ड्या चोरासाठी व त्याची हत्या घडवून आणण्यामध्ये ज्यांनी अत्यंत महत्वाची भुमिका निभावली त्या गोयर कंपनीशी नेमके आपले संबंध काय? असा सवाल आ.अनिल अण्णा गोटे यांनी पत्रकात केला आहे.

 

LEAVE A REPLY

*