Type to search

Breaking News धुळे

अतिक्रमण काढण्यास मुस्लीम बहूल भागातून सुरुवात करा! : माजी आ.अनिल गोटे यांचा सल्ला

Share

धुळे – 

अतिक्रमण निर्मुलनाला माझा सक्रीय पाठिंबा असून अतिक्रमण काढण्याचा प्रारंभ आझादनगर, मच्छीबाजार, मौलवीगंज, वडजाईरोड, ऐंशीफुटी रस्ता येथूनच करावा, आग्रारोडवर केव्हाही कारवाई करता येईल असा सल्ला माजी आ.अनिल गोटे यांनी दिला आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नवनिर्वाचित आ. डॉ.फारूख शहा यांनी शहरातील अतिक्रमणाच्या अत्यंत गंभीर व ज्वलंत प्रश्नाला हात घालून सदर प्रश्न सोडविण्याकडे लक्ष घातले आहे.

त्यांच्या अतिक्रमण निर्मुलनाच्या संकल्पनेस माझा सक्रीय पाठिंबा आहे. आग्रारोडचे अतिक्रमण हा गंभीर प्रश्न आहेच. त्याबद्दल दुमत नाही. पण आझादनगर, मच्छीबाजार, वडजाईरोड, मौलवीगंज, ऐंशीफुटी रस्ता या भागात असलेल्या वस्त्यांमध्ये तीन चाकी रिक्षा सुद्धा जाऊ शकत नाही. महापालीकेच्या नकाशात हे सर्व रस्ते 12 ते 18 मीटर म्हणजे 40 ते 60 फुट रूंद दर्शविले आहेत.  या भागात आग लागली तर आगीचा बंब सुद्धा पोहचू शकणार नाही. असाच स्थितीमुळे भिवंडी येथे हजारो कुटूंबाचे संसार आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. धुळ्यात असे होऊ नये यासाठी सातत्याने अतिक्रमणा विरूद्ध आवाज उठविला आहे. यासाठीच माझा नवनिर्वाचित आमदारांना अतिक्रमण निर्मुलनाच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी पाठिंबा आहे.

आठ-दहा दिवस कॉलनी भागातील नळांना पाणी येत नाही. रस्त्यावर घाणीचे व कचर्‍याचे ढिग पडले आहेत. महिना-महिना गटारी साफ होत नाहीत. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्यावरचे दिवे गेल्यानंतर दिवे बदलायला कोणी येत नाही. नेमके प्राधान्य कुठल्या कामाला द्यायचे ? याचे अजिबात ज्ञान नसलेल्यांना सत्तेत बसून महापालिकेत लुटीचा अंदाधुंद कार्यक्रम सुरू आहे. असा आरोप गोटे   यांनी केला आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात तब्बल सत्तर लाख रूपये खर्ची घालून प्रवेशद्वार उभे केले जात आहे.  असंख्य अडचणींचा सामना करून शहरातील जनता मेटाकुटीला आली आहे. यावर काही उपाय तर करीत नाहीत. पण प्रवेशद्वार करायला निघाले आहेत. असे पत्रकात गोटे यांनी म्हटले आहे.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!