अमरनाथ यात्रेकरुंवरील भ्याड हल्ल्याचा निषेध

0
धुळे । दि.11 । प्रतिनिधी-अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवाद्यांचा भ्याड हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पाकिस्तानी झेंडा जाळून निषेध करण्यात आला.
अमरनाथ यात्रेहून परतणार्‍या भाविकांवर सोमवारी रात्री अनंतनाग येथे यात्रेकरुंच्या बसवर केलेल्या निर्दयी हल्ल्यात आठ ते दहा भारतीय यात्रेकरु नागरिक ठार झाले. 15 ते 20 यात्रेकरु गंभीर जखमी झाले. ठार झालेल्या यात्रेकरुंना श्रध्दांजली वाहण्यात आली. या भ्याड हल्ल्याचा धिक्कार करण्यात आला.

लष्कराला शस्त्रांचा धाक दाखवून भारतीय सैन्याचे मनोबल खच्चीकरण करणार्‍या चीनचा निषेध करण्यात आला. चिनी वस्तू खरेदी करू नयेत, चिनची आर्थिक कोंडी करण्याचा संकल्प करावा असे आवाहन करीत सर्व चिनी वस्तूंची महाराणा प्रताप चौकात होळी करण्यात आली.

यावेळी माजी आ.राजवर्धन कदमबांडे, रंगनाथ काळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, महापौर सौ.कल्पना महाले, उपमहापौर उमेर अन्सारी, सभापती कैलास चौधरी, महिला बालकल्याण सभापती इंदुताई वाघ, महिला जिल्हाध्यक्षा सौ.ज्योतीताई पावरा, सभागृहनेते अर्शद पठाण, नगरसेवक संदीप पाटोळे, माजी जि.प.सभापती सचिन बेडसे, जावेद बिल्डर, माजी नगरसेवक बाळू आगलावे, संजय वाल्हे, राजू बोरसे, रणजीत राजे भोसले, भगवान चौधरी, गुलशन उदासी, रजनीश निंबाळकर, युवती अध्यक्ष मीनल पाटील, तालुकाध्यक्ष नरेश चौधरी, विठ्ठलसिंह गिरासे, शिरपूर तालुकाध्यक्ष दिनेश मोरे, नरेंद्र तोरवणे, राहूल पाटील, सतीश पाटील, मयूर ठाकरे, कुंदन पवार, रईस काझी, ललीत वारुडे, सुरेश अहिरराव, देवा कोळी, शिंदखेडा शहराध्यक्ष प्रकाश चौधरी, हिरामण बैसाणे, नितीन बेडसे, चंद्रकांत पवार, किरण बच्छाव, संजय खैरनार आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*