Type to search

धुळे

अमळनेरातील व्यावसायिकाला धुळ्यात महामार्गावर लुटले

Share

धुळे । अमळनेर येथील व्यावसायिकाला शहरातील महामार्गावरील हॉटेल नालंदा जवळ मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांनी पोटाला चाकु लावून लुटल्याची घटना गेल्या 4 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. त्यांच्याकडील रोख 35 हजार व 10 हजारांचा मोबाईल लुटण्यात आला.  याप्रकरणी तिघांविरूध्द आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत खडी क्रशर व्यावसायीक जैनुल नसीरोद्दीन शेख (वय 36 रा. कसाई मोहल्ला, अमळनेर) यांनी  पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार दि.4 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता धुळे शहरालगत असलेल्या महामार्गावरील सोहम का ढाबा व नालंदा हॉटेल दरम्यान मोटरसायकलने जात असतांना विनानंबरच्या एका मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांनी त्यांना रस्त्यात अडविले. मारहाण करीत पोटाला चाकु लावून शेख यांच्याकडील 35 हजारांची रोकड व दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून घेतला. शेख यांनी विरोध केला असता त्यांच्या उजव्या हाताच्या दंडाला एकाने धावा घेत त्यांना जखमी केले.

याप्रकरणी शेख यांनी काल दि.12 नोव्हेंबर रोजी आझादनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून तिघा अनोळखींवर भादंवि 394, 34 अन्वये गुन्हा दाखल झाला. तपास उपनिरिक्षक एम.जे. सैय्यद करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!