अंगणवाडी कर्मचार्‍यांचा प्रश्न सुटणार

0
धुळे । दि. 1 । प्रतिनिधी-राज्यातील अंगणवाडी सेविका,मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या विविध प्रश्नांवर आ. कुणाल पाटील व अन्य सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले.
यावेळी लक्षवेधीवरील चर्चेला उत्तर देतांना महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यात येतील, असे ठोस आश्वासन दिल्याने अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मागण्या मंजुर होण्याची आशा निर्माण झाली आहे.
आ.कुणाल पाटील यांनी देशातील इतर राज्यात अंगणवाडी कर्मचार्‍यांना मिळत असलेले मानधन आणि महाराष्ट्रातील तुटपूंजे मानधन यांच्यातील तफावत अभ्यासपूर्ण मांडले.

शिवाय कुपोषण मुक्तीच्या लढ्यातील अंगणवाडी कर्मचारी महत्वपूर्ण घटक असल्याने शासन या घटकाकडे दुर्लक्ष करून कुपोषण मुक्ती चळवळीला हरताळ फासत असल्याचा आरोप केला.

त्यासाठी राज्यातील वाडा,वस्ती,पाडा अशा ठिकाणी सुरू असलेल्या 11 हजार मिनी अंगणवाड्यांचे रुपांतर नियमित अंगणवाड्यात करण्याची त्यांनी ठोस मागणी केली.

लक्षवेधीच्या चर्चेची सुरूवात आणि शेवटही आ.कुणाल पाटील यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मांडतांना अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासन कोणती ठोस कार्यवाही करणार आहे आणि त्यासाठी कालबध्द कृती कार्यक्रम हाती घेणार आहे हा नेमका प्रश्न उपस्थित करत शासनाला या विषयी ठोस आश्वासन देण्यास भाग पाडले.

राज्यातील अत्यंत महत्वपूर्ण विषयावर आ.कुणाल पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी चर्चेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीची गटनेते जयंत पाटील, ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख, आ.प्रणिती शिंदे, व दोन्ही बाजूच्या सदस्यांनी भाग घेतला.

 

LEAVE A REPLY

*