अंगणवाडी कर्मचार्‍यांचा 4 ऑगष्टला मोर्चा

0
धुळे । दि.31 । प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना पनवेलतर्फे अंगणवाडी कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेचे अध्यक्ष माया परमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली 4 ऑगष्ट रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे कार्याध्यक्ष युवराज बैसाणे यांनी कळविले आहे.
महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी बैठक घेण्यात आली. बैठकीत इतर राज्यात मिळणार्‍या मानधनाच्या धर्तीवर राज्याच्या अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव तयार करुन वित्त विभागाकडे विनाविलंब सादर करण्यात येईल आणि प्रस्तावाला त्वरित मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन ना.पंकजा मुंडे यांनी दिले होते.

अंगणवाडीचा जीआर दिवाळीपूर्वी काढावा, अंगणवाडी कर्मचार्‍यांना पूर्ण वेळ काम देवून शासकीय कर्मचार्‍याचा दर्जा लागू करावा, समितीने सादर केलेल्या प्रस्तावातील अंगणवाडी कर्मचार्‍यांना मानधनवाढ व इतर शिफारशींची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.

या मागण्यांसाठी राज्यव्यापारी मोर्चाचे आयोजन करण्यात आली असून मोर्चात सहभागी होण्यासाठी कर्मचार्‍यांनी मुंबई येथे जाण्यासाठी दि.3 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता धुळे रेल्वेस्टेशन येथे जमावे, असे आवाहन कार्याध्यक्ष युवराज बैसाणे, रामकृष्ण पाटील, रवींद्र ब्राम्हणे, सुषमा माळी, नयना मराठे, क्रांती खैरनार, निर्मला पाटील, मोहिनी पाटील, इंदिरा पाडवी, चंद्रकला चव्हाण, संगीता जाधव, विजया वसावे, विद्या मोरे यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*