वेगवेगळ्या अपघातात चौघे ठार

0
धुळे । दि.19 । प्रतिनिधी-वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार झाले. याबाबत धुळे तालुका पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
परिवहन महामंडळाची एमएच 18 बीटी 3911 क्रमांकाची बस नाशिक येथून जळगावकडे नेत असताना मुंबई-आग्रा महामार्गावर पुरमेपाडानजिक हॉटेल शिवशक्तीपुढे बसचा टायर पंक्चर झाल्याने चालकाने महामार्गाच्या बाजूला बस थांबवली.
बसचा वाहक नमदीम खान अन्वर खान पठाण (वय 27) हे टायर पहात असताना एमपी 13 जीए 5440 क्रमांकाचा आयशर मालेगावहून धुळ्याकडे भरधाव वेगानेयेत असताना आयशर चालकाने बसला मागून धडक दिली.
या अपघातात बसचा वाहक नमदीम खान अन्वर खान पठाण व मोहम्मद अक्रम उस्मान शेख (वय 42), रा.बुलढाणा हे मयत झाले. तसेच एस.टी. बसचे नुकसान करुन अपघाताची माहिती न देता ट्रकचालक पळून गेला.

याबाबत बसचा चालक नरेंद्र दिनकर पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 304 (अ), 279, 337, 338, 427 सह मोटार वाहन कायदा कलम 184, 134, 177 प्रमाणे ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

एमएच 18 ई 8605 क्रमांकाची कालीपिली व्हॅन भरधाव वेगाने नेत असताना मळाणे गावशिवारात कालीपिली रस्त्याच्या विरुध्द बाजूला उतरवून गाडीसोबत टोयन केलेली बस (क्र.एमएच 19 वाय 6330) खड्ड्यात जावून पडली.

या अपघातात शरद उर्फ रावसाहेब बुधा पाटील (वय 40), रा.चोपडा हा मयत झाला. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात मनोज पंढरीनाथ पाटील यांनी फिर्याद दिली.

भादंवि 304 (अ), 279, 337, 338, 427 सह मोटार वाहन कायदा कलम 184, 134, 177 प्रमाणे कालीपिली व्हॅन चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फागणे, ता.धुळे येथील इंदिरा नगरात राहणारा गौतम सुनील पाटील (वय 4) हा घरासमोर खेळत असताना दुपारी तीन वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने गौतमला चिरडले.

त्यात तो जखमी झाला. त्याला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासून गौतमला मृत घोषित केले. अपघाताची नोंद तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

*