Type to search

धुळे फिचर्स

होळी उत्सवावर विरजण; अपघातात तरूण ठार

Share

धुळे

शहराबाहेरून जाणार्‍या मुंबई- आग्रा महामार्गावरील पांझरा नदीच्या पुलावर भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत तरूण ठार झाला. याप्रकरणी आझादनगर पोलिसात अज्ञात वाहनावरील चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान तरूणाच्या मृत्यूमुळे तो सहभागी असलेल्या होळी उत्सवावर विरजन पडले आहे.

जयेश वसंत बागुल (वय 23 रा. महावीर हौंसिंग सोसायटी, छोरीया नगर, मालेगाव रोड, धुळे) असे मयत तरूणाचे नाव आहे. तो. काल दि. 8 रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास तो दुचाकीने मुंबई- आग्रा महामार्गाने शिरपूरकडून मालेगावकडे येत असतांना शहरातील पांझरा नदीच्या पुल संपल्यानंतर त्याला भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला.

त्याला चुलत काका नितीन चौधरी यांनी जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात दाखल केले. डॉ. अहिरे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याबाबत सनी सुरेश बागुल (रा. आग्रा रोड, शेरे पंजाब हॉटेलच्या बाजुला, धुळे) याने आझादनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनावरील चालकाविरूध्द भांदवि कलम 304 (अ), 279, सह मो.वा.का.क 184, 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!