Friday, April 26, 2024
Homeधुळेवेगवेगळ्या अपघातात तरूणासह दोन ठार

वेगवेगळ्या अपघातात तरूणासह दोन ठार

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

तालुक्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत तरूणासह दोन जण ठार झाले आहे. याबाबत तालुका पोलिसात दोन वेगवेगळ्या गुन्हे दाखल झाले आहेत.

- Advertisement -

धुळे तालुक्यातील विंचुर येथील रहिवासी बाळा उर्फ यशोदिप संजय बोरसे (वय 21) हा तरूण काल दि. 18 रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास दुचाकीने (क्र. एमएच 18 एआर 2000) जात असतांना त्याला शिरूड चौफुली ते बोरकुंड रस्त्यावर मागून येणार्‍या भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली.

त्यात त्यात यशोदिप हा फेकला जावून त्याच्या डोक्याच्या डाव्या बाजुला गंभीर दुखापती झाल्याचा त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक पसार झाला. याप्रकरणी अरूण जगन्नाथ बोरसे (रा. विंचुर) यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात अज्ञात वाहनावरील चालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

तसेच दुसर्‍या घटनेत रोकडे हनुमान मंदिराजवळ दुचाकी खड्यात पडून झालेल्या अपघातात मागे बसलेले शंकर नारायण पाटील (रा. आर्वी ता. धुळे) यांचा मृत्यू झाला. त्यांना ऋषीकेश सुकदेव पाटील (रा. धाडरे ता. धुळे) हा त्यांच्या ताब्यातील दुचाकीवर (क्र. एमएच 19 डीपी 2537) मागे बसवून भरधाव वेगाने जात असतांना रोकडे मंदिराजवळ दुचाकी खड्डयात पडून अपघाता झाला.

त्यात मागे बसलेले शंकर पाटील हे गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. हा अपघात दि. 17 रोजी सायंकाळी घडला. याप्रकरणी साहेबराव पंडीत पाटील रा. धाडरी यांच्या फिर्यादीवरून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ऋषीकेश पाटील यांच्याविरूध्द धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या