Type to search

धुळे

ट्रक अपघातात सहचालक जागीच ठार

Share

धुळे । भरधाव वेगाने येणारा ट्रक उभ्या ट्रकवर आदळल्याने सहचालकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव चौफुलीनजिक घडली़ या अपघातात एक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चाळीसगाव चौफुली जवळ एमएच 28 एबी 8175 क्रमांकाच्या ट्रकवर पाठीमागून येणारा ट्रक धडकला. मागील ट्रकच्या कॅबिनचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता़ कॅबिनमध्ये झोपलेले सहचालक रामदास भास्कर मजल (रा़ कन्नड) याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला़ तर ट्रकवरील चालक गंभीर जखमी झाला़ रस्त्यावर उभा असणारा ट्रक हा मालेगावकडे जाण्यासाठी उभा होता़ तर पाठीमागून पारोळा रोडकडून येणारा एमएच 20 डीई 7000 या क्रमांकाचा ट्रक उभ्या असणार्‍या ट्रकवर धडकला़ एक ट्रक दुसर्‍या ट्रकमध्ये घुसल्याने क्रेनची मदत घेऊन त्यांना बाजुला करण्यात आले़ या अपघातात जखमी झालेल्या दोघांना उपचारार्थ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ तत्पुर्वी या अपघातातील सहचालक याचा मृत्यू झाला़ चालकाला डुलकी आली असावी आणि यातून अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे़

या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती़ अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!