दराणे फाट्याजवळ ट्रक-कार अपघातात दोन ठार

0
धुळे । दि.5 । प्रतिनिधी-दराणे फाट्यानजिक ट्रक व कार समोरासमोर धडकल्याने झालेल्याह अपघातात दोन ठार व दोन जण जखमी झाले. जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोंडाईचा-धुळे रोडवरुन एमएच 18 एए 3303 मिनीट्रक धुळ्याकडून दोंडाईचाकडे भरधाव वेगाने चालक नेत असताना दराणे फाट्याजवळ दोंडाईचाकडून धुळ्याकडे येणारी स्विफ्ट कार (क्र.एमएच 19/3937) ला समोरुन धडक दिली.

या अपघातात कारचालक ज्ञानेश्वर भालेराव पाटील (वय 33, रा.पटेल कॉलनी, दोंडाईचा) आणि त्याच्या बाजूस बसलेला प्रविण बन्सीलाल लखोटे (वय 45, रा.स्वामीनारायण मंदिरमागे, दोंडाईचा) हे दोघे जागीच ठार झाले.

तर कारच्या मागील सीटवर बसलेले शेख जयवंत पाटील (वय 29) आणि हिंमत भिका पाटील (वय 28) दोघे राहणार झिरवे हे गंभीर जखमी झाले.

दोन्ही वाहनांचे नुकसान करुन अपघाताची माहिती न देता ट्रक सोडून चालक पळून गेला. ही घटना दि.3 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता घडली.

याबाबत रवींद्र हिरालाल पाटील यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 304 (अ), 279, 337, 338, मोटार वाहन कायदा कलम 184, 134, 177 प्ररमाणे मिनीट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि चव्हाण हे करीत आहेत.

 

 

LEAVE A REPLY

*