Type to search

धुळे फिचर्स

आईसमोर मुलीचे अपहरण

Share

धुळे  –

तालुक्यातील रतनपुरा येथे भरदिवसा आईसोबत जाणार्‍या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तिघांविरूध्द तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे तालुक्यातील रतनपुरा येथील रहिवासी व मजुरीचा व्यवसाय करणारी 35 वर्षीय महिला दि. 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आपल्या 15 वर्षीय मुलीसह गावातील पिंपळा चौक येथे नुतन महाजन शाळेजवळून आर्वीकडे जाणार्‍या रस्त्यावरून सरकारी दवाखान्यात पायी जात होत्या.

त्यादरम्यान विलास जगलू सोनवणे (रा. देवघट ,ता. मालेगाव) याने दोन मित्रांच्या मदतीने मुलीचा हात धरून तिला रिक्षात बसवून पळवून नेले. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने धुळे तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ बी.आर. पाटील करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!