Type to search

धुळे

जवानांच्या प्रशिक्षणादरम्यान गोळी लागल्याने मेंढपाळ गंभीर जखमी

Share

आर्वी | वार्ताहर – धुळे तालुक्यातील आर्वी येथील रोकडे हनुमान मंदिराच्या पाठीमागे अंजनी डोंगर असून याठिकाणी एसआरपी जवानांचे गोळीबार प्रशिक्षण होत असते. यादरम्यान आज दुपारी एका मेंढपाळ करणार्‍या तरूणाला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे त्याचे नातेवाईकांनी सांगितले.

नाना उदा बुरगले (वय ३५ रा. धनगर वस्ती, आर्वी) असे जखमी तरूणाचे नाव आहे. दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. येवढी मोठी घटना घडून देखील उशिरापर्यंत एसआरपीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आलेले नव्हते. त्यामुळे तरूणाच्या नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरवर्षी याठिकाणी गोळीबाराचे प्रशिक्षण होत असते. प्रशिक्षणादरम्यान या परिसरामध्ये गुरे मेंढपाळ करणारे लोकांना बंदी घातलेली असते. परंतु हा व्यक्ती त्याच्या ठरलेल्या जागेपासून लांब अंतरावर होता. तरीदेखील त्याला खांद्याजवळ गोळी लागली असून ती शरीरामध्ये शिरली आहे. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करुन गोळी बाहेर काढावी लागणार आहे. त्याची प्रकृती गंभीर असून देखील एसआरपीचे जवान किंवा अधिकारी कोणी चौकशीसाठी आले नाही. नाना बुरगुले याची घरची परिस्थिती नाजुक असून त्याला आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी त्याच्या नातेवाईकांकडून होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!