Type to search

धुळे

शेतकर्‍यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा

Share

युवराज हाके
आर्वी । जिल्ह्यासह संपुर्ण राज्यात पाऊस लांबल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मृग नक्षत्र संपुन आता आद्रा नक्षत्र सुरू झाले आहे. परंतू अद्यापही पाऊस नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षापासुन निर्सगाचा समतोल बिघडत असल्यामुळे शेतकर्‍यासह व्यावसायीक देखील अडचणीत आला आहे. त्यात मजुरांचे हाल होत आहेत. पाऊस नसल्यामुळे ग्रामीण भागात चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती आणखी खालावण्याचे चिन्ह आहेत. अनेक शेतकर्‍यांनी पावसाळ्यापुर्वी महागडी बियाणे, खते खरेदी करून ठेवले आहेत. काहींनी मे महिन्यात ठिंबकव्दारे कापुस लागवड केली आहे. परंतू आता विहिरींनी तळ गाठल्यामुळे हजारो रूपये खर्च झाल्यानंतर पाऊस लांबणीवर पडल्यामुळे शेतकर्‍यांचे डोळे पाणावले आहेत.

दुग्ध व्यवसायावर परिणाम- जनावरांसाठी चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जंगलात चारा नाही. नदी, नाले, विहिरी कोरड्या झाल्यामुळे पिण्याचा पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. महागडा चारा विकत घेवून जनावरांचा उदरनिर्वाह होत आहे.

ड्रीपमुळे शेतकर्‍यांना आशा- काही शेतकर्‍यांनी थोड्याफार पाण्यावर मे महिन्यात ठिबकव्दारे कपाशीची लागवड केली आहे. यामुळे कमी पाण्यात चांगली शेती करता येत असल्याचे काही शेतकरी सांगत आहेत. कमी पाण्यात ड्रीपची व्यवस्था करून चांगले उत्पन्न घेतले जाते. परंतू कोरडवाहु शेतकर्‍यांची निराशा आहे.

भाऊ चारा देस का- शेतकरी आता एकमेंकाडे चार्‍याची मागणी करू लागले आहेत. भाऊ चार देस का, अशी हाक आता ऐकु येवु लागली आहे. चार्‍यासाठी शेतकर्‍यांना भटकंती करावी लागत आहे. देवाला साकडे घालत शेतकरी पावसासाठी याचना करीत आहे.

चारा छावणी सुरू करा- शेतकर्‍यांना मदत जाहीर करावी. कर्जमाफी करावी, गुरांसाठी चारा छावणी सुरू करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे. प्रशासनाने देखील शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ राहवे, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

पावसाची हुलकावणी
दरारोज उन्ह सावलीचा खेळ सुरू असून ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे. आज पाऊस येणार,असे वातावरण तयार होत. परंतू काही वेळातच वारा सुटतो आणि ढग गायब होतात. अशी दररोजची हुलकावणी निसर्ग देत आहे.

देवाला साकडे
आर्वीसह परिसरात चांगल्या पावसासाठी ग्रामस्थ देवाला साकडे घालत आहेत. स्वामी समर्थ केंद्रात दररोज पर्जन्यसुक्ताचे वाचन केेले जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!