जातप्रमाणपत्र सादर न केल्याने आर्वीच्या ग्रा.पं.सदस्या पाटील अपात्र

0
धुळे । दि.27 । प्रतिनिधी-तालुक्यातील आर्वी ग्रामपंचायतीत सदस्या असलेल्या श्रीमती कदरबाई फकिरा अल्लोर उर्फ भागाबाई कौतिक पाटील यांनी जात प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी त्यांना अपात्र घोषित केले आहे.
यासंदर्भात आर्वी येथील विठ्ठल संतोष पाटील यांनी तक्रार दाखल केली होती.

आर्वी ग्रामपंचायतीची पोट निवडणूक दि.24 ऑगस्ट 2016 रोजी झाली. त्याचा निकाल 26 ऑगस्ट 2016 रोजी लागला.

या निवडणुकीत प्रभाग 1 व 2 मधून राखीव जागेवर श्रीमती कदरबाई उर्फ भागाबाई पाटील विजयी झाल्या. त्यांनी सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने विठ्ठल पाटील यांनी त्यांच्या अपात्रतेची मागणी केली होती.

यासंदर्भात तहसीलदार यांच्याकडील अहवाल तपासून जिल्हाधिकारी यांनी श्रीमती कदरबाई अल्लोर उर्फ भागाबाई पाटील यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.

महाराष्ट्र ग्रा.पं. अधिनियम 1958 चे कलम 10-1 अ नुसार हा निवाडा देण्यात आला असून याकामी विठ्ठल पाटील यांच्यावतीने अ‍ॅड.अमोल थोरात यांनी काम पाहिले.

 

LEAVE A REPLY

*