Friday, April 26, 2024
HomeUncategorizedधुळे : आणखी ९ रुग्ण पॉझिटिव्ह

धुळे : आणखी ९ रुग्ण पॉझिटिव्ह

 जिल्ह्यातून आणखी दहा जणांची करोनावर मात

 जिल्ह्यातील बाधितांची संख्या ७९

धुळे  – 

धुळ्यात आज पुन्हा 9 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने बाधितांची संख्या आता 79 झाली आहे.यापैकी एका 68 वर्षीय महिलेसह एक तरुणांचा मृत्यू झाला आहे.बधितांमध्ये देवपूर नेहरू नगर चौकातील 3, जिल्हा कारागृहातील  3 आणि टपाल कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी नेहरू चौकातील तरुण बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. तो पुण्याला जॉब ला होता. लॉक डाऊनमुळे घरी परतला होता.आज पॉझिटिव्ह आढळून आलेले तिनही जण त्याच्याशी संबंधित आहेत.टपाल कार्यालयातील मुख्य प्रवर अधीक्षकांचा 2 दिवसांपूर्वी औरंगाबादला मृत्यू झाला असून या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मिळून 7 जण रुग्णालयात दाखल आहेत.

जिल्ह्यातून आणखी दहा जणांची कोरोनावर मात

श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून आज आणखी 10 जणांनी कोरोना विषाणूवर मात केली. त्यात भांडूप (मुंबई) येथील सहा जणांचा, तर राज्य राखीव पोलिस दलाच्या तीन जवानांसह धुळे शहरातील एकाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या आता 47 वर पोहोचली आहे. या दहा जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

जिल्ह्यात आतापर्यंत 37 रुग्ण कोरोना विषाणूपासून मुक्त झाले आहेत. त्यात आज 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. या दहा जणांमध्ये मुंबई- आग्रा महामार्गावर धमाणे गावाजवळ झालेल्या अपघातातील सहा जणांचा समावेश आहे. याशिवाय राज्य राखीव पोलिस दलाचे तीन जवानही कोरोनामुक्त झाले. त्यांना आज दुपारी सर्वोपचार रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

यावेळी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नागसेन रामराजे, नोडल अधिकारी तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी, विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, डॉ. निर्मल रवंदळे, डॉ. अरुण मोरे, डॉ. अनंत बोर्डे, डॉ. राजेश सुभेदार, डॉ. परवेज मुजावर, डॉ. रामानंद, अधिसेविका अरुणा भराडे, नागेश सावळे, गिरीश चौधरी आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या