Type to search

maharashtra आवर्जून वाचाच धुळे मुख्य बातम्या राजकीय

देवपुरातील केंद्रांमध्ये सकाळपासूनच रांगा

Share
धुळे । शहरातील देवपूर परिसरातील मतदान केंद्रांमध्ये सकाळपासून उत्साह दिसून आला. त्यात महाजन हायस्कूल, आयटीआय व लाला सरदार हायस्कूलमध्ये मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. या उत्साह सायंकापर्यंत टिकून असल्याचे चित्र दिसू
न आले. दरम्यान उमेदवारांकडून नमस्कार, ज्येष्ठ-वरिष्ठाचा पाया पडून मतदारांचे स्वागत करण्यात आले.

महापालिका निवडणुकीत यंदा मतदारांमध्ये चांगलाच उत्साह दिसून आला. देवपूर परिसरातील आदर्श हायस्कूल, महाजन हायस्कूल, आयटीआय, एस.एस.व्ही.पी.एस महाविद्यालय, लाला सरदार हायस्कूल यासह इतर मतदान केंद्रांचा समावेश होता. या मतदान केंद्रांमध्ये सकाळपासूनच मतदारांची गर्दी दिसून आली.

आठ वाजेनंतर तर काही केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. पंरतू केंद्रातील काही खोलीमध्ये मतदारांचा शुकशुकाट दिसून आला. रिक्षा, कार, जीपव्दारे मतदारांना केंद्राबाहेर उतरविले जात होते. अनेकांना घरीत मतदान स्लीप मिळाल्याने त्यांना थेट मतदान केंद्रात जाता आले. पंरतू ज्यांनी स्लीप मिळाली नाही.

त्यांना मतदान केंद्राबाहेरील बुथवर तत्काळ स्लीप देण्यात आली. मतदान केंद्रांबाहेर उमेदवार व कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली. तसेच मतदान केंद्राबाहेरही पोलिसांचा बंदोबस्त होता. दुपारनंतर या केंद्रामध्ये मतदारांची चांगलीच गर्दी झाली होती. त्यामुळे आग्रा रोडवरील वाहतूकीवर काहीसा परिणाम झाला होता. मतदान प्रक्रीया शांततेत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!